Narendra Modi And Amol Mitkari esakal
महाराष्ट्र बातम्या

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राजीनामा देण्याचे धाडस दाखवतील का ?

की फक्त 'मन की बात' मध्ये श्रद्धांजली वाहत बसतील?

गणेश पिटेकर

मुंबई : युक्रेनची स्थिती रशियाच्या हल्ल्यांमुळे दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. मंगळवारी (ता.एक) रशियाच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. नवीन शेखरप्पा असे त्या तरुणाचे नाव आहे. नवीनच्या मृत्यूमुळे नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या सरकारवर टीका होत आहे. युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी मदत मिळत नसल्याच्या व्यथा सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन देशवायांना सांगितले आहे. नवीनच्या मृत्यूवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आज बुधवारी (ता.दोन) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे. (Is Prime Minister Narendra Modi Dare To Resignation?, Says Amol Mitkari)

मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राजीनामा देण्याचे धाडस दाखवतील का? की फक्त 'मन की बात' मध्ये श्रद्धांजली वाहत बसतील?, असा खोचक टोला अमोल मिटकरी यांनी मोदी यांना लगावला आहे. काँग्रेस पक्षाचे नाना पटोले, मंत्री जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आदींनी या घटनेबाबत प्रतिक्रिया नोंदविला आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT