students admission sakal
महाराष्ट्र बातम्या

दहावी पास-नापासांना ‘ITI’ प्रवेशाची संधी! १२जूनपासून प्रवेशाला प्रारंभ; यंदा १,५४,३९२ जागा

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाची सुरवात १२ जूनपासून होणार आहे. २० जुलैला प्रवेशाची पहिली यादी जाहीर होऊन प्रवेश घ्यायला सुरवात होईल. विद्यार्थ्यांना https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाची सुरवात सोमवारपासून (१२ जून) होणार आहे. २० जुलैला प्रवेशाची पहिली यादी जाहीर होऊन प्रवेश घ्यायला सुरवात होईल. विद्यार्थ्यांना https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे.

आयटीआय प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक पात्रता असलेल्या १४ वर्षांवरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी पात्र असणार आहे. या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज, नोंदणी शुल्क भरणे, पसंतीच्या ‘आयटीआय’ची निवड करणे, अर्जात दुरुस्ती व हरकती नोंदविण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्यातील ४१८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ९५ हजार ३८० आणि ५७४ खासगी ‘आयटीआय’मध्ये ५९ हजार १२ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश (मुलींसाठी एकूण ५३ हजार ६०० जागा राखीव) मिळणार आहे. १२ जूनपासून प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार असून १ सप्टेंबरपर्यंत प्रवेशाचे टप्पे पूर्ण होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

दहावीनंतर पुढे शिकून तर कोठे सरकारी नोकरी लागणार आहे, असा भविष्याचा विचार करून अनेकजण ‘आयटीआय’कडे वळत असल्याची वस्तुस्थिती आहे. आता अकरावीसह तंत्रनिकेतनचे (अभियांत्रिकी डिप्लोमा) देखील प्रवेश सुरु आहेत. त्यामुळे कोणत्या प्रवेशाला विद्यार्थ्यांची पसंती सर्वाधिक राहिली, विद्यार्थ्यांचा कल काय आहे हे ऑगस्टमध्ये स्पष्ट होणार आहे.

‘आयटीआय’ प्रवेशाचे वेळापत्रक

  • ऑनलाइन अर्जाची सुरवात : १२ जून ते ११ जुलै

  • पहिल्या फेरीसाठी संस्था पसंतीक्रम : १९ जून ते १२ जुलै

  • अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : १६ जुलै

  • पहिली प्रवेश फेरी : २० जुलै

  • द्वितीय प्रवेश फेरी : ३१ जुलै

  • दुसऱ्या यादीनुसार प्रवेश : १ ते ४ ऑगस्ट

  • तिसरी प्रवेश फेरी : ९ ऑगस्ट

  • चौथी प्रवेश फेरी : २० ऑगस्ट

फिटर, इलेक्ट्रिशनला सर्वाधिक पसंती

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून एक-दोन वर्षाचा ट्रेड (कोर्स) पूर्ण करून दहावीनंतर लगेचच खासगी नोकरीत पदार्पण करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षी साधारणतः: एक लाख तरुण-तरुणी ‘आयटीआय’ला प्रवेश घेतात. ‘आयटीआय’च्या माध्यमातून एकूण ८२ प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामध्ये फिटर व इलेक्ट्रिशन या दोन कोर्सला सर्वाधिक मागणी असून दरवर्षी त्या ट्रेडचे १०० टक्के प्रवेश हाऊसफुल होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT