Maratha Andolan manoj jarange esakal
महाराष्ट्र बातम्या

''एका दिवसात अध्यादेश काढता येईल, एवढे पुरावे मी देतो, तज्ज्ञही पुरवतो'' जरांगे पाटलांचं सरकारला आवाहन

संतोष कानडे

जालनाः सरकारची जर इच्छाशक्ती असेल तर एका दिवसात अध्यादेश निघेल. तेवढे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यांना विनाकारण फिरण्याची गरज नाही; असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, हैदराबाद संस्थानपासूनचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. सरकारच्या समितीला सर्व पुरावे आम्ही तेव्हाच देणार होतो मात्र समितीने कामच केलं नाही. त्यामुळे आता जर सरकार मराठा आरक्षणासाठी कायदा करण्यास तयार असेल तर सरकारचा वेळ वाचवण्यासाठी मी तयार आहे.

''माझ्याकडे सरकारसाठी सर्व पुरावे आहेत. मराठा समाज कुणबी असल्याचे हे पुरावे असून हैदराबाद संस्थानची कागदपत्रं आहेत. सरकारला या कागदपत्रांच्या आधारे एका दिवसात अध्यादेश काढता येईल. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळेल, यासंबंधीचे पुरावे आहेत.''

जरांगे पुढे म्हणाले की, सरकारला टिप्परभर पुरावे पाहिजेत का? माझ्याकडे एक असा कागद आहे, तेवढ्यावरच अध्यादेश निघू शकतो. सरकार म्हणेल अधिवेशन नाहीये. परंतु त्याचीही गरज नाही. आमच्याकडे अधिकृत कागदपत्रे आहेत. आम्ही सरकारला वेठीस धरत नाहीत. परंतु त्यांनी विनाकारण वेळखाऊपणा करु नये. कागदपत्रांसह तज्ज्ञांची टीमही आम्ही पुरवतो, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.

सायंकाळी सहा वाजता जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी सरकारला चार दिवसांचा वेळ दिल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केलं. आज रात्रीपर्यंत सरकार समिती नेमण्यासंदर्भात जीआर काढणार असल्याचा बोललं जात आहे. शिवाय दुसरी एक समिती स्थापन करण्यात येणार असून ती एकसदस्यीय समिती असेल, अशीही चर्चा आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT