महाराष्ट्र बातम्या

'उद्या रत्नागिरीतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात' : प्रमोद जठार

- मकरंद पटवर्धन

केंद्रीय मंत्री म्हणून कोणत्याही प्रोटोकॉलचे पालन न करता पोलिसांनी अतिरेक्यांप्रमाणे वागणूक दिली.

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांची अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक होऊ नये, म्हणून पालकमंत्री अनिल परब यांनी डीपीडीसीची बैठक लावली. परंतु दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात स्वतः अनिल परब (Anil parab) पडल्याचे जनतेने व्हायरल व्हिडीओतून पाहिले. याची दखल पीएमओने घेतली असून व्हिडीओ आणि शिवसेना शाखाप्रमुखाप्रमाणे वागणाऱ्या एसपींची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजपने (BJP) केली आहे, अशी माहिती जन आशीर्वाद यात्रेचे (jan aashirvad yatra start tommorrow) संयोजक प्रमोद जठार (pramod jathar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. द. रत्नागिरी भाजप कार्यालयात सायंकाळी उशिरा ही पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, शहराध्यक्ष सचिन करमरकर आदी उपस्थित होते.

यावेळी जठार म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा येत्या शुक्रवारपासून (२७) रत्नागिरीतून सुरू होईल आणि सिंधुदुर्ग येथे दोन दिवस राहील. सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत नारायण राणे रत्नागिरीत यात्रा करतील. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ दिवस यात्रा करून सांगता होईल.

कालच्या घटनेबद्दल बोलताना जठार म्हणाले, केंद्रीय मंत्री म्हणून कोणत्याही प्रोटोकॉलचे पालन न करता पोलिसांनी अतिरेक्यांप्रमाणे वागणूक दिली. जेवताना दरवाजा तोडू, असे एसपींनी मेगा फोनवरून जाहीर केले. कायद्याचे रक्षक असणारे एसपी, पोलिस शिवसेना शाखाप्रमुखाप्रमाणे वागत होते. पोलिस बंदोबस्तात रस्त्यावरची पोस्टर्स फाडली जात होती. अटकेला घाबरत नव्हतो. शिवसेनेने अटक करावी, हे चॅलेंज दिले होते. अमित शाह (Amit shaha) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी राणे यांची दूरध्वनीवरून चौकशी केली.

पुढे जठार म्हणाले, नारायण राणे दुपारी खोलीत जेवताना दरवाजा पोलिसांनी मेगाफोन लावून इशारा दिला. आपण दरवाजा उघडला नाही तर तोडू, एसपी व डीवायएसपींनी निर्देश दिले. औषध घेत होते. विनंती करत होतो, प्रोटोकॉल पाळा, मी यात्रेचा संयोजक आहे. माझ्याकडे नोटिस, वॉरंट द्या, मी सही घेऊन देतो. न्यायालयीन कामकाजात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. अटक करण्याच्या प्रक्रियेला आमचा विरोध नव्हता. रायगडचे जिल्ह्याचे एसपी उपस्थित होते. त्यांच्यांकडे ताब्यात घेण्याचे कागदही होते. परंतु शेवटपर्यंत त्यांनी दिले नाहीत. संगमेश्वर पोलिस चौकीबाहेर दीड तास गाडीत बसवून ठेवले. तिथे आम्ही ठिय्या आंदोलन केले. रायगड पोलिसांच्या ताब्यात आहोत, हे बातमीवरून कळले. तेव्हा डीवायएसपींनी सांगितल्यावर एसटी एक तासाने एसपी बाहेर आले व म्हणाले मी दुसऱ्या महत्त्वाच्या कामात होतो.

अनिल परब खड्ड्यात पडले

अनिल परब यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ जगाने पाहिला. परबांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेल्यांपैकी कोणी घात केला हे शोधून काढले पाहिजे. कारण स्थानिक आमदार, मंत्री असूनही त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी पाठवले आहे व दुसऱ्याला मंत्रीपद मिळालेले नाही. त्यांना ते पालकमंत्रीपद हवे असावे. त्यांच्यापैकीच कोणी माईक चालू ठेवला असावा. परबांचा जाहीर निषेध करतो. १०० कोटींचा मलिदा जमवणाऱ्या या मंत्र्याने मुद्दाम डीपीडीसीची बैठक लावली खरी पण तेच खड्ड्यात पडले आहेत, असा टोला जठार यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Cleanliness: 'मुंबईला स्वच्छ शहराचा किताब का मिळू नये?' उच्च न्यायालयाचे महापालिकेला फटकारे, इंदूरचा आदर्श घेण्याचे निर्देश

Shirala Mini Konkan Monsoon Tourism : लोणावळा-महाबळेश्वर विसरा! शिराळ्याचं 'मिनी कोकण' धुक्यात न्हालं; विकेंडला पर्यटकांची तुफान गर्दी, कास पठारसारखं खुललं सौंदर्य

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; सातारा, सोलापूरसह तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

Climate Change & Sleep: हवामान बदलाचा झोपवर परिणाम! भारत ठरतोय हॉटस्पॉट; शारीरिक, मानसिक आरोग्याला मोठा धोका

Income Tax 2026: TDS, TCS आणि Advance Tax म्हणजे नेमकं काय? फरक समजून घ्या नाहीतर भरावा लागू शकतो मोठा दंड

SCROLL FOR NEXT