Sharad Pawar, Ajit Pawar and Jayant Patil  
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil : अजित पवार यांच्याशी मतभेद असल्याच्या चर्चांवर जयंत पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या आधीपासून अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापण दिनाच्या कार्यक्रमापासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा होत्या. त्यातच अजित पवार यांनी बंड करत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. तर जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यातच आता पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत मतभेद असल्याच्या चर्चांना भूमिका स्पष्ट केली.

जयंत पाटील यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना म्हटलं की, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थित सभा होत आहे. पुढची सभा 25 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात होणार आहे. त्यासाठी जिल्हा भरातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येणार आहे.

कोल्हापुरातून शाहू महाराज लोकसभेला उमेदवार असतील, यावर पाटील म्हणाले की, तशा पद्धतीची चर्चा अजूनतरी झालेली नाही. त्याबद्दल निर्णय झाल्यास आम्ही नक्की कळवू. मात्र जे आवश्यक आहे ते करावेच लागते, असंही त्यांनी नमूद केलं.

सध्या लोकसभा निवडणूक खूप लांब आहे. मात्र त्याआधीच पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. त्या विरोधात  जनता आहे. जनतेपर्यंत जाऊन शरद पवार आपली भूमिका मांडत, असल्याचं पाटील यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासोबत असलेल्या वादावर विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, अजित पवार आणि माझ्यात कोणतेच वाद नाहीत. आम्ही शरद पवार यांचे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे त्यांच्यासोबत राहिलो.

दरम्यान शरद  पवार ओबीसी नेत्यांना टार्गेट करत आहेत हा गैरसमज काहीजण पसरवत आहेत. मात्र तसं नसून शरद पवार हे महाराष्ट्रभर सभा घेणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यानंतरच कोल्हापुरात सभा होत आहे. यापुढे जळगाव आणि पुणे येथे सभा होणार आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या बद्दल गैरसमज पसरवण्याचे काम चुकीचं असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगळुरुतून जगभरात वाढवतायत 'ओळख मायबोलीची', देशविदेशातील हजारो विद्यार्थी शिकत आहेत मराठी

Rinku Singh Father Passed Away : क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या वडिलांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

आजचे राशिभविष्य - 27 फेब्रुवारी 2026

Paneer Fried Rice Recipe: उरलेला भात फेकू नका! फक्त 15 मिनिटांत बनवा रेस्टॉरंट-स्टाइल पनीर फ्राइड राइस

Panchang 27 February 2026: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्राचे पठण आणि ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT