Beed Baban Shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Beed Crime News: १५९ कोटी रुपयांची फसवणूक अन् मथुरेत संताचा वेश, बीडचा बबन शिंदे कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात?

Beed Baban Shinde: येथील जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे आर्थिक व्यवहार जुलै २०२३ मध्ये बंद झाले.

आशुतोष मसगौंडे

बीड येथील जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांची १५९ कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणातील मुख्य संशयित बबन शिंदे याला अखेर १५ महिन्यांनी पकडण्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

उत्तर प्रदेशमधील मथुरा वृंदावन परिसरातून बबन शिंदेला अटक करण्यात आली. शिंदे हा मथुरेतील वृंदावन येथे संताच्या वेशात वावरत होता.

येथील जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे आर्थिक व्यवहार जुलै २०२३ मध्ये बंद झाले. यावरून बबन शिंदे, अनिता शिंदेसह इतरांवर बीड व धाराशिव जिल्ह्यात पाच गुन्हे नोंद आहेत.

सुरवातीपासून मुख्य संशयित व सोसायटीचा मुख्य प्रवर्तक बबन शिंदे परागंदा होता. सातत्याने आपली ठिकाणे बदलत, सिम कार्ड बदलत तो राहत होता. फरारी काळात बबन शिंदे वेगवेगळे सिम कार्ड वापरत असे. तसेच तो दिल्ली, आसाम, नेपाळ, उत्तर प्रदेश, ओडिशा आदी राज्यांतही राहिला.

सध्या तो वृंदावन मथुरा परिसरात संताच्या वेशात राहत असल्याची माहिती मिळाल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्यास जेरबंद केले. फौजदार एस.एस. मुरकुटे, तुळजीराम जगताप, संजय पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटच्या ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणात पोलिसांनी एमपीआयडी अंतर्गतचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil Jitendra Awhad Eknath Shinde : जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड रात्रीतून एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंद दाराआड ४५ मिनीटांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

Tamil Nadu CM Vijay: तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा अनोखा निर्णय! जन्मलेल्या प्रत्येक बाळाला मिळणार सोन्याची अंगठी; 'मामा'ची अनोखी भेट

Maharashtra News: मुख्यमंत्र्यांच्या परस्पर भेटीवरून नाराजी? सुनेत्रा पवारांकडून विचारणा; तटकरे यांचा इन्कार

Pune Rain: पुणेकरांना दिलासा! आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन; पुढील २-३ दिवस हलक्या सरींचा अंदाज

Miraj Assembly Constituency : 'मिरज मतदारसंघ खुला झाला तरी मी निवडणूक लढवणारच'; आमदार खाडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, राजकीय समीकरणे बदलणार?

SCROLL FOR NEXT