महाराष्ट्र बातम्या

'कोल्हेंनी गोडसेची भूमिका कलाकार म्हणून केली तरी...' आव्हाड संतापले

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आता नथुराम गोडसेच्या (Nathuram Godse) भुमिकेत दिसणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वत:च आपल्या फेसबुक पोस्ट्सद्वारे दिली आहे. 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटात असलेली त्यांची ही भूमिका आता वादात सापडण्याची शक्यता आहे. हा चित्रपट 2017 सालचा असून तो सध्या फक्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 30 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Why I killed Gandhi)

यावर आता त्यांच्याच पक्षातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला असून त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी आता ट्विट करत म्हटलंय की, डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही.

पुढे त्यांनी म्हटलंय की, विनय आपटे-शरद पोंक्षे यांना ह्या भूमिके बद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनी प्रचंड विरोध केला, त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून ह्या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

जितेंद्र आव्हाड यांनी याआधी म्हटलंय की, पक्षाचा आणि सर्वांचा काही संबंध असतो असे मला वाटत नाही. राज्यातील कुठल्याही कलाकाराने नथुरामाची भूमिका करावी, हे मला पटलेले नाही. अभिनय वरवर करता येत नाही. एक कलाकार या नात्याने त्यांनी भूमिका नाकारायला हवी होती. ज्या नराधमाने महात्मा गांधी यांना गोळ्या घातल्या त्या माणसाचा अभिनय करणे मला मान्य नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टपणे म्हटलंय. एकप्रकारे त्यांनी अमोल कोल्हे यांच्या या अभिनयावरुन नाराजीच व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT