Jitendra Awhad on rohit pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad : शरद पवार गटात मतभेद; ''रोहित पवार यांच्या वक्तव्याला मी महत्व देत नाही'' काय म्हणाले आव्हाड?

राम मांसाहारी होता, असं विधान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांनी गुरुवारी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 'राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता...''

संतोष कानडे

मुंबईः राम मांसाहारी होता, असं विधान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांनी गुरुवारी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 'राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?' असं विधान आव्हाडांनी केलं होतं.

जितेंद्र आव्हाडांच्या विधानानंतर रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आव्हाड म्हणाले, रोहित पवार लहान आहेत, त्यांच्या वक्तव्याला मी महत्त्व देत नाही. मी अभ्यासपूर्ण मांडली केली आहे. तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो.

रोहित पवार काय म्हणाले होते?

जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांवर केलेल्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी पोस्ट लिहिली होती. 'नको त्या विषयावर बोलून आज वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे'.

रोहित पवार पुढे म्हणाले की, 'देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय आहे. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ… या राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचे भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे!', असं त्यांनी आपल्या 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटलं होतं.

काय म्हणाले आव्हाड?

  • माझ्याकडचे पुरावे वाचा. हे मी लिहिलेले नाहीत. मी जे बोलतो ते अभ्यास करुन बोलतो. खटल्यांना मी घाबरत नाही.

  • कधी कधी भाषण करत असताना आपण काही बोलून जातो. मी खेद व्यक्त करतो. आता का फाशी घ्यावी का?

  • आम्हीही रामाला मानतो, मी राम मंदिराला जाणारा आहे. पण, आमचा राम बहुजनांचा आहे. शबरीला शोधणारा आमचा राम आहे, असं आव्हाड म्हणाले.

  • आजकाल लोकांच्या भावना महत्त्वाच्या झाल्या आहेत. आमचा राम हृदयात आहे, तर त्यांचा राम बाजारात आहे. 

  • रोहित पवार अजून लहान आहेत. त्यांच्या वक्तव्याला मी महत्व देत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT