jogendra kawade jogendra kawade
महाराष्ट्र बातम्या

'महाविकास आघाडीच्या काळात दलितांवर अत्याचार वाढले'

पीपल्स रिपब्लिकन पक्ष सत्तेत सहभागी असला तरी दोन वर्षांपासून सत्तेचा वाटा न मिळाल्याने कवाडे यांनी नाराजीही व्यक्त केली

सुनिल इंगळे

पीपल्स रिपब्लिकन पक्ष सत्तेत सहभागी असला तरी दोन वर्षांपासून सत्तेचा वाटा न मिळाल्याने कवाडे यांनी नाराजीही व्यक्त केली

औरंगाबाद: महाविकास आघाडीच्या कार्यकाळात राज्यातील दलितांवर अत्याचार वाढल्याची खंत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे (पीरिपा) संस्थापक अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी येथे सोमवारी (ता. १६) पत्रकार परिषदेत व्यक्त केली. पीरिपा सत्तेत सहभागी असला तरी दोन वर्षांपासून सत्तेचा वाटा न मिळाल्याने कवाडे यांनी नाराजीही व्यक्त केली. यावेळी श्री. कवाडे यांनी महाविकास आघाडीतील सत्तेत असलेले लोकप्रतिनिधींवर आरोप केले.

कवाडे म्हणाले, ‘‘बुलडाणा, जालना येथील दलितांवर झालेल्या अत्याचाराविरोधात पीडितांच्या हक्कासाठी उभे राहण्या ऐवजी येथील लोकप्रतिनिधी आरोपीला मदत करत असल्याचे समोर आले आहे; तसेच महाड येथील पूरग्रस्त भागाचा दौरा करताना एका गावात दलित समाजातील नागरिकांवर हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचा नकार देण्यात आला, या विरोधात पोलिस पाटलाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे; तसेच बीडमध्ये दलितांवर रोज अत्याचार होत आहे’’, असेही ते म्हणाले.

अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासन दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केले. पक्षाच्या वतीने आता या विरोधात समाजाला आधार व पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात रिपब्लिकन गार्ड तयार करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, सत्तेत सहभागी असले तरी अद्याप सत्तेचा वाटा मिळालेला नाही. यामुळे सत्तेत पाच टक्के वाटा द्यावा, अशा मागण्याचे पत्र काँग्रेसच्या नेत्यांना देण्यात आले आहे. दरम्यान, यासंदर्भात लवकर निर्णय न घेतल्यास येणाऱ्या निवडणुकांवर याचा परिणाम दिसून येईल असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये पाठवणार, आणखी ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Kolhapur District Bank Election : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ, भय्या माने यांच्यासह दिग्गजांना धक्का; सलग दहा वर्षे संचालक असलेल्यांना सर्कीट बेंचचा दणका

Sindhudurg Farmer Compensation : e-KYC अपूर्ण असल्यास 4 कोटी 41 लाखांची नुकसानभरपाई अडकणार; सिंधुदुर्गातील 'या' 2,212 शेतकऱ्यांना मोठा फटका

Maharashtra Live News : भाजपने निवडणूक आयोगाला ओलीस ठेवले आहे – इम्रान मसूद

IPL 2027 Trade : एक मोठा खेळाडू Mumbai Indians च्या ताफ्यात येतोय? भविष्याचा कर्णधार म्हणून सक्षम पर्याय; आश्चर्यचकित करणारी Deal

SCROLL FOR NEXT