Kirit Somaiya on Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी बोगस तक्रारदार उभा केला; सोमय्यांचा खळबळजनक आरोप

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. किरीट सोमय्या, नील सोमय्या यांच्याशी संबंधीत तक्रार करणारा तक्रारदारच बोगस होता, असा दावा सोमय्यांनी केला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा गैरवापर करुन कोर्टात खोटे शपथपत्र दाखल केले. तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याशी संगनमत करुन मंत्रालयाला गुंडाचा अड्डा बनवला.

२३ फेब्रुवारी २०२२ उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पंढरीनाथ शंकरराव साबळे हा बोगस तक्रारदार उभा केला. मुळात तक्रारदारच खोटा आहे. मी दोन महिने त्यांना शोधत आहे. पण सापडत नाही. हा माणूस जिवंत आहे की नाही हे फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना माहिती आहे.

हेही वाचाः का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

वसई पालघरमध्ये सव्वाचारशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलेला होता. नील सोमय्यांच्या कंपनीत राकेश वाझवान पार्टनर असल्याचा आरोप केला. परंतु जी तक्रार केली तीच बोगस निघाली. तब्बल १२७ दिवस माझ्यावर आणि कुटुंबावर आरोप केल्याचं सोमय्यांनी सांगितलं.

किरीट सोमय्यांनी पुढे सांगितलं की, बोगस तक्रारीवर मुख्यमंत्री राहिलेल्या उद्धव ठाकरे यांची सही आहे. अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांना तपासून कारवाई करावी, असं उद्धव ठाकरे यांनी लिहिलं. निकॉन इन्फ्रा या कंपनीविरोधात मुळात कोणीही तक्रार केली नव्हती. शेवटी निल सोमय्यांविरोधात कोणतीही तक्रार नाही, हे त्यांनी कोर्टात लिहून दिलं.

सहा महिने चौकशी केल्यानंतर पंढरीनाथ साबळेला पत्र पाठवून चौकशी बंद करण्यात आली. तुम्ही काहीही पुरावे दिले नाहीत, असं पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. या प्रकरणात आपण उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सविस्तर माहिती दिल्याचं सोमय्यांनी सांगितलं. दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Red Sea tension: लाल समुद्रात इस्रायली जहाजांना बंदी! हूती बंडखोरांचा मोठा निर्णय; दिसताच हल्ला करण्याची धमकी

IND vs AFG: भारताचा अफगाणिस्तानवर इतिहासातील सर्वात मोठा विजय; पदार्पणवीर मानव सुतारसह वॉशिंग्टन सुंदर चमकले

Mumbai: मुंबईतील विहार तलावाला पौर्तुगीजकालीन इतिहास, पावणेचारशे वर्षांपूर्वीचे अवशेष अजूनही जिवंत

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये वादळी वाऱ्यामुळे डाळिंब बागेला फटका

MSRTC Bus Trouble: दे धक्का! ४५ किमी प्रवासात लालपरी ५-६ वेळा बंद पडली, प्रवाशांवरच ढकलण्याची वेळ

SCROLL FOR NEXT