महाराष्ट्र बातम्या

Lalit Patil: ललित पाटील प्रकरणातील आरोपांनंतर दादा भुसेंचा सुषमा अंधारेंना इशारा; सिद्ध न झाल्यास...

ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी भुसेंनी प्रशासनावर दबाव टाकल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केला होता.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार प्रकरणात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता भुसेंनी देखील अंधारे यांना प्रत्युत्तर देताना गंभीर इशाराही दिला आहे. (Lalit Patil Dada Bhuse warning to Sushma Andhara after allegations)

नाना पटोलेंना आव्हान

माध्यमांशी बोलताना भुसे म्हणाले, "ललित पाटीलला मदत करणारे जो कोणी आमदार असेल, सामान्य नागरिक असेल त्याची माहिती नाना पटोलेंनी अधिवेशनाची वाट न पाहता सरकारवर विश्वास असेल तर ताबडतोब पोलिसांत तक्रार करावी. त्यांच्याकडे जी माहिती, पुरावे असतील ते त्यांनी सादर करावेत. (Latest Marathi News)

चौकशीची माझी तयारी

या सर्व विषयाच्या चौकशीची माझी तयारी आहे. मला वाटतं नाही की, याला इतकं काही महत्व दिलं पाहिजे. चौकशीत काहीच आढळून आलं नाही तर सुषमा अंधारे यांनी मालेगावच्या नागरिकांची माफी मागावी, दिलगिरी व्यक्त करावी. (Marathi Tajya Batmya)

...तर मानहानीचा दावा करणार

जगाच्या पाठीवरच्या ज्या यंत्रणेमार्फत चौकशी करायची ती करा. माझे कॉल रेकॉर्ड चेक करा ज्याच्या फोनवर आले असतील त्याचे चेक करा. कदाचित मी जर दुसऱ्याच्या फोनवरुन फोन केले असतील तर त्याचेही करावेत. पण माझ्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास मी त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहे, अशा शब्दांत दादा भुसे यांनी सुषमा अंधारे यांना कारवाईचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT