महाराष्ट्र बातम्या

Lalit Patil Drugs Case: ललित पाटील हॉटेलवर दर महिन्याला खर्च करत होता 'इतके' लाख, वर्षभर खोली राहत होती आरक्षित

ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेल्या ललित पाटील दर महिन्याला हॉटेलवर १७ लाख रुपये खर्च करत असल्याची बाब पोलिसांच्या तपासातून उघडकीस आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Lalit Patil Drugs Case: ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेल्या ललित पाटील दर महिन्याला हॉटेलवर १७ लाख रुपये खर्च करत असल्याची बाब पोलिसांच्या तपासातून उघडकीस आली आहे. ससून रुग्णालयात तो दाखल असला तरी हॉटेलमध्ये त्याच्यासाठी वर्षभर खोली आरक्षित ठेवण्यात येत असल्याचेही या तपासून पुढे आले आहे.

ड्रग्सच्या पैशांचा तो अशा पद्धतीने उधळपट्टी करत असल्याचे कारनामे समोर येत आहेत. येरवडा कारागृहातील तीन वर्षांच्या काळात ललित पाटील तब्बल नऊ महिने ससून रुग्णालयात राहिला. मैत्रिणी भेटण्यासाठी आल्यानंतर तो रुग्णालयातून हॉटेलमध्ये जायचा. हॉटेलमध्ये त्याची एक खोली नेहमी आरक्षित होती.

एका कैद्यास इतक्या सुविधा कशा मिळाल्या? हा प्रश्न सर्वांना पडला होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर पोलिसांच्या तपासातून मिळाले आहे. या सर्व सुविधांसाठी ललित पाटील तब्बल १७ लाख रुपये महिन्याला देत होता. पुण्यातील १६ क्रमांकाच्या वॉर्डात कामावर असलेल्या पोलिसांचे सहकार्याने तो हे सर्व करीत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

पोलीस कर्मचारी अडचणीत

ललित पाटील कैदी असतानाही मोटारीने बिनधास्त फिरत होता. मॉल, हॉटेलमध्ये खरेदी करायचा. त्याला मदत करणारे पोलिस कर्मचारी आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात दहा पेक्षा जास्त पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Paper Leak : केमिस्ट्री, फिजीक्सनंतर बारावीचा गणिताचा पेपर फुटला; नागपुरात घडला प्रकार, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?

Medha Mankumre Point Accident : मेढ्यातील मानकुमरे पॉइंटजवळ उलटली कार; पाचवड-खेड हायवेवर नेमकं काय घडतंय? ठेकेदाराच्या 'या' चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!

Latest Marathi News Live Update : कुसुमाग्रजांच्या नगरीत आजपासून चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला होणार सुरुवात

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात उकाडा वाढणार; मार्च उष्ण ते अतिउष्ण राहण्याची शक्यता

Toll Plaza Pass : अवघ्या ३४० रुपयांत मिळतोय टोल पास, करता येतो अमर्यादित प्रवास, 'या' वाहनधारकांना फायदा

SCROLL FOR NEXT