devendra fadnavis eknath shinde and vijay vadettivar 
महाराष्ट्र बातम्या

तीन पक्षाचं रूपांतर विदर्भातील खड्या तमाश्यात, कोणी नाच्या...; वडेट्टीवारांची सरकारवर जहरी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगावले यांनी एका कार्यक्रमात खळबळजनक गौप्यस्फोट केले होते. त्यावरून विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत तिखट शब्दात सरकारवर हल्लाबोल केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, सरकारमध्ये तीन तिघाडा आणि काम बिघाडा आहे. कोण काय बोलतं ? कोण काय शोध लावतं? कोण कसे कमेंट करतो? कोण कोणावर कुरघोडी करतो? कोण बायकोला सोडेल म्हणून सांगतो, कोणी असं सांगतो की माझी बायको आत्महत्या करेल… म्हणून मंत्रीपद द्या… या सगळ्या विचित्रपणाला राज्यातील जनता वैतागली आहे.

उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यावर कुरघोडी करतात म्हणजे या राज्यातील मुख्यमंत्री कोण? सरकार कोण चालवतंय? कोणाचा सरकारवर कंट्रोल आहे की गाडी बना ड्रायव्हरची आहे, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.

दरम्यान ट्रिपल इंजिनला ड्रायव्हरच नाही. जो येईल त्याला रोंदत चाललं आहे. याचा लोक हा तमाशा पाहात आहेत…आता हे नाटक होतं…आता नाटकाचे रूपांतर तमाशात होतंय… आणि तीन पक्षाचं रूपांतर विदर्भातील खड्या तमाश्यात होणार, मग कोणीतरी तुतारी वाजवेल…कोणी तरी नाच्याची भूमिका स्वीकारेल…कोणी तरी पायाला गुगरू बांधून नाचेल. हा तमाशा महाराष्ट्रातील लोकांना दिसणार, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला.

वडेट्टीवार यांनी कांदा अनुदानावरून सरावर हल्ला चढवताना म्हटलं की, लहरी पद्धतीने सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे कांद्याचे दर १० ते १२ रुपयांवर आले. बांगला देशाच्या सीमेवर शुल्क वाढल्यामुळं हजारो टन कांदा पडला आहे. कांदा उत्पादकांसंदर्भात सरकार गंभीर नाही.

सरकारचे वाचाळवीर मंत्री म्हणत आहेत, कांदा खाणे परवडत नसेल तर कांदा खाऊ नका…उद्या हे तेल महाग झालं तर तेल घेऊ नका, साखर महाग झाली तर साखर खाऊ नका म्हणतील. म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी पोटभर खावं, आणि जो गरीब, मध्यम वर्गीय आहे यांनी मात्र, महाग झालेलं खाणे बंद करावं आणि उपाशी मरावं का, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT