Ajit Pawar VS Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: शरद पवार गट आक्रमक; विधानपरिषदेत आमदार अपात्रतेसाठी 2 अर्ज दाखल

कार्तिक पुजारी

मुंबई- विधानपरिषदेत राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेसाठी शरद पवार गडाकडून 2 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठीही हालचाली सुरु झाल्याचं दिसतंय. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना दोन अर्ज करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी अर्ज केले आहेत.

जयंत पाटील यांनी केलेल्या अर्जात आमदार विक्रम काळे, अमोल मिटकरी, सतिश चव्हाण, अनिकेत तटकरे यांचा उल्लेख आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्या अर्जामध्ये रामराजे निंबाळकर यांच्या नावाचा उल्लेख आहे.

अजित पवार गटाविरोधात आमदारांच्या यादीमध्ये ४१ विधानसभेचे आमदार आणि विधानपरिषदेचे ५ आमदार अशी नोटिस देण्यात आली आहे. जे नेते तटस्थ राहिले होते, त्यांच्याविरोधातही ही नोटिस देण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

शरद पवार गटामध्ये ४१ आमदार राहिल्याचं स्पष्ट होत आहे. नवाब मलिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही, त्यामुळे ते तटस्थ आहेत. ९ मंत्री आणि इतर सर्व आमदार यांचा या नोटिसीमध्ये समावेश आहे. हे सर्व नेते अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. पण, नरहरी झिरवळ, चेतन तुपे, अतुल बेनके यांनाही शरद पवार गटाकडून नोटिस पाठवण्यात आली आहे.

आमदार अपात्रतेच्या प्रत्यक्ष सुनावणीची तारीख ठरली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या ४० आमदारांची आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांची ही सुनावणी १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं. सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असल्याचं स्पष्ट केलं होतं. आता एकाच दिवशी दोन्ही गटांची सुनावणी होणार आहे.

शरद पवार गटातील आमदार पुढील प्रमाणे

जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, सुमन पाटील, अशोक पवार, सुनील भुसारा, प्राजक्त तनपुरे, बाळासाहेब पाटील, अनिल देशमुख, संदीप क्षिरसागर, राजेश टोपे यांचा समावेश शरद पवार गटाच्या आमदारांमध्ये करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जीवदान मिळालं, तरी गणित फसलं! विक्रमांचा पाऊस पाडणारा Virat Kohli कसा बाद झाला पाहा... Video Viral

Woman Mountaineer : पुण्यातील महिला गिर्यारोहकांनी ‘माऊंट मेंटोक कांग्री-२’ शिखरावर फडकवला तिरंगा

Latest Marathi News Live Update : केतन अन् सियाच्या साखरपुड्याचा व्हिडिओ अखेर समोर

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन, आयोगाचा मोठा निर्णय, मुख्य परीक्षेच्या तारखेतही बदल...

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

SCROLL FOR NEXT