Mumbai Lift Accident 
महाराष्ट्र बातम्या

Highland Park Accident:ठाण्याच्या हायलँड पार्कमध्ये दुर्घटना, सहा लोकांचा मृत्यू

ठाण्यातील बाळकुम भागात इमारतीतील लिफ्ट कोसळून ६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Manoj Bhalerao

बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीच्या लिफ्टचा रोप तुटून झालेल्या अपघातात खाली येणाऱ्या सहा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५ ते पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. तर या अपघातात अन्य एक कामगार गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेने ठाणे शहरात खळबळ उडाली होती. महेंद्र चौपाल (३२), रुपेश कुमार दास (२१), हारून शेख (४७ ) , मिथलेश (३५) , कारिदास ( ३८) अशी मृत कामगारांची नावे असून, सहाव्या मृत कामगारां नाव समजू शकलं नाही. तसेच सुनिल कुमार दास (२१) असे जखमी कामगाराचे नाव आहे. अपघातग्रस्त लिफ्ट थेट ४० व्या मजल्यावरून थेट भूमिगत तीन मजली पार्किंग असलेल्या बेसमेन्टवर येऊन कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.

ठाण्यातील बाळकुम येथील नारायणी शाळेच्या बाजूला रुणवाल आयरीन या नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या ४० मजली इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सात कामगार लिफ्टने खाली येत होते. त्याच लिफ्टचा रोप अचानक तुटून हा अपघात घडला. (Latest Marathi News)

या घटनेची माहिती मिळताच कापुरबावडी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिक माजी नगरसेवक संजय भोईर यांनी दुर्घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली. बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. या दुर्घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी दोन कामगारांना खाजगी रुग्णालयात तातडीने हलवले. ही दुर्घटना नेमकी कशी घडली. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT