Chief Minister Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलणार? मुख्यमंत्री म्हणाले...

राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी राज्यातील ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी राज्यातील नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या. पण या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सागितलं आहे. सध्या पावसाळा आहे, अडचणी निर्माण होऊ शकतात, पावसाळ्यात मनुष्यबळही जास्त लागेल त्यासाठी या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात यावर आयोगाशी चर्चा करणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. (CM Eknath Shinde)

ओबीसी आरक्षणासंदर्भातील प्रकरण सध्या कोर्टात आहे. यावर निर्णय येणे बाकी आहे पण आरक्षणावर निर्णय झाल्यावर निवडणुका घ्याव्यात अशी आमची पहिल्यापासून इच्छा आहे. सगळी कडे पाऊस आहे, बऱ्याच ठिकाणी पूर येत आहे आणि अशा परिस्थितीत निवडणुकीसाठी यंत्रणा तयार करणे अवघड आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाला बोलणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?

या दौऱ्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी आणि केंद्रीय मंत्री राजनाथसिंग यांच्या भेटी घेतल्या, यानंतर माध्यमांशी संवाद साधला, यादरम्यान मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबद्दल विचारले असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही भेट सदिच्छा भेट आहे. आम्ही दोघं उद्या आषाढी एकादशी झाली की मुंबईत बसून चर्चा करू आणि तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर देऊ असे त्यांनी सांगितलं. अधिवेशन हे पुढे ढकलले जाणार का यावर बोलतांना शिंदे यांनी सांगितले की, १८ तारखेला राष्ट्रपतीपदाची निवडणूक असल्याने ते मागे-पुढे होऊ शकते. पण या अधिवेशनाच्या पुर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT