Loksabha Election 2024 
महाराष्ट्र बातम्या

Loksabha Election 2024: लोकसभा लढवण्यावरून प्रश्न अन् पृथ्वीराज चव्हाणांनी हात का जोडले?

पत्रकार परिषदेमध्ये रमेश चेन्नीथला यांना पृथ्वीराज चव्हाण हे सातारा किंवा पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे, असे विचारले.

Sandip Kapde

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात प्रश्न विचारला असता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हात जोडले. काँग्रेसच्या जिल्हानिहाय बैठकीनंतर त्यांना आयोजित पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यानंतर त्यांनी चक्क हात जोडले.

पत्रकार परिषदेमध्ये रमेश चेन्नीथला यांना पृथ्वीराज चव्हाण हे सातारा किंवा पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे असे विचारला. त्यावर चव्हाण यांनी लगेच हात जोडत मी लोकसभेसाठी इच्छुक नाही असे सांगितले. तर चैन्नीथला यांनी ‘पृथ्वीराज चव्हाण राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून उभे राहू शकतात’ असे उत्तर दिले.

प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत घेण्याबाबत देखील  रमेश चैन्नीथला यांनी भूमिका स्पष्ट केली.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे चर्चा करत आहेत. आंबेडकरांच्या प्रवेशासाठी आमची काहीही हरकत नाही. पण अद्याप निवडणूक जाहीर झालेल्या नसल्याने महाविकास आघाडीत त्यांच्या प्रवेशाचा निर्णय जाहीर झालेली नाही, असे चैन्नीथला यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असे वक्तव्य सत्ताधारी नेत्यांनी केले होते. यावर चैन्नीथला म्हणाले, काँग्रेसचा कोणताही नेता भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, भाजप चर्चा घडवून आणून अफवा निर्माण करत आहे. हे तोडफोड करून स्थापन झालेले सरकार आहे, यास जनतेचा पाठिंबा नाही, त्यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी चांगले यश मिळवेल. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT