Lungs-Health-Day 
महाराष्ट्र बातम्या

दर २ सेकंदात दगावतो एक फुप्फुसाचा रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

चुलीच्या धुरामुळे ३८ लाख व्यक्तींना फुप्फुसाचे आजार
नागपूर - जगाची ९० टक्के लोकसंख्या कोणत्या काही प्रमाणत प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. विशेष असे की, दर दोन सेकंदात फुप्फुसाच्या आजाराने एक जण दगावतो तर दरवर्षी ५ लाख मृत्यू हे सीओपीडीमुळे होतात, विशेष असे की, चुलीच्या धुरातून ३८ लाख व्यक्तींना सीओपीडी हा आजार होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून पुढे आले आहे. 

फुप्फुसांचे आजार पूर्वी दुर्लक्षित होते. परंतु, हवेतील वाढते प्रदूषण, माणसांमधील कमी प्रतिकार शक्ती यामुळे फुप्फुसाच्या आजारात वाढ झाली. कॅन्सरवर नियंत्रणासाठी घेण्यात येणाऱ्या औषधांचा तसेच हृदयाच्या ठोके नियंत्रणासाठी आवश्‍यक असलेल्या औषधांमुळेही फुप्फुसांच्या आजारात वाढ होत असल्याचे संशोधनातून पुढे आले.

जनमानसात फुप्फुस विकारावर जागृती व्हावी या हेतूने २५ सप्टेंबर हा दिवस जागतिक फुप्फुस आजारदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त सुपर स्पेशालिटीच्या श्‍वसनरोग विभागप्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांच्याशी संवाद साधला. डॉ. मेश्राम म्हणाले, तरुणाई धूम्रपानाकडे फॅशन म्हणून बघते. परंतु, धूम्रपान करणाऱ्याच्या बाजूला असलेल्या व्यक्तीलाही जोखीम असते. जगाचा विचार करता धूम्रपान करणाऱ्यांसभोवतालच्या २० ते २५ लाख व्यक्तींना सेकंड हॅंड स्मोकिंगमुळे जीव गमवावा लागतो. तर ४० लाखांवर लोकं वायू प्रदूषणग्रस्त असल्याचे पुढे आले. याशिवाय ३८ लाख लोकसंख्या चुलीच्या तसेच इतर धुरामुळे पीडित राहते. धुरापासून होणाऱ्या फुप्फुसाचा अर्थात सीपीओडी (क्रॉनिक ऑबस्ट्रॅक्‍टिव्ह पल्मोनरी डिसीज) आजाराने दगावणाऱ्या रुग्णांच्या संख्येत जगात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगात ४० कोटी जनता सीपीओडीने त्रस्त आहे. तीन कोटी भारतीय लोकांनाही या आजाराचा विळखा पडला असून दरवर्षी ५ लाख मृत्यू सीपीओडीने  होतात.

फुप्फुस आजारास कारणीभूत ठरणारे घटक
सिगारेटचा धूर, रसायने, ॲस्बेस्टॉसची धूळ, सिलिका, धातुकण, हवेतील प्रदूषण, कोळशाचे कण, धोकादायक पदार्थ फुफ्फुसात शिरणारे घटक, एक्‍स रे यंत्रातून निघणारी प्रकाश किरणे, फुप्फुसात झालेले संसर्गदोष.

घरातील गादीवर, चुलीवर स्वयंपाक करताना, कारपेटवरील तसेच न दिसणाऱ्या घरातील कचऱ्यातूनही फुप्फुसाला इजा करणारे घटक श्‍वसनावाटे शरीरात प्रवेश करतात. चुलीवर फुंकणी फुकण्यातून दम्याचे रूपांतर पुढे सीओपीडीत होते. यामुळे महिलांनी स्वयंपाकापासून तर घरकाम करताना सजगता बाळगावी. धूम्रपानामुळे फुप्फुसात लवकर संसर्ग होतो. 
-डॉ. सुशांत मेश्राम, विभागप्रमुख, श्‍वसनरोग विभाग, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik child death accident : खेळता खेळता पाण्याच्या टाकीत डोकावला अन्... नको तेचं घडलं, १८ महिन्यांच्या शौर्यचा करून अंत

IPL 2026 : Vaibhav Suryavanshi च्या बाजूला बसून राजस्थान रॉयल्सच्या 'त्या' व्यक्तीची चुकीची कृती; BCCI कारवाई करण्याच्या तयारीत

Crime: तरुणीने लग्नाचा प्रस्ताव नाकारला; युवकाने रागातून एचआयव्हीचं इंजेक्शन टोचलं, घाबरलेल्या मुलीचं भयंकर कृत्य

LPG Gas Cylinder: LPG गॅसच टेन्शन संपणार? युद्ध थांबल्यानंतर गॅस साठा आणि पुरवठ्याबाबत सरकारची मोठी माहिती

जास्त आइस्क्रीम आरोग्यासाठी घातक; कृत्रिम घटकांमुळे वाढतो आजारांचा धोका

SCROLL FOR NEXT