महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : श्री सेवकांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री एमजीएम रुग्णालयात

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एमजीएम रुग्णालयात दाखल झाले आहे.

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, मानपत्र आणि २५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून आप्पासाहेबांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रम भर उन्हात झाल्याने धर्माधिकारी यांच्या श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल झाले आहेत.

हवे ते उपचार श्री सेवकांना मिळावेत, गरज पडली तर विशेष वॉर्ड तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमजीएम प्रशासनाला दिले आहे.

आज तापमानाचा पारा ३७ अंशांवर गेला होता. उघड्या मैदानात महाराष्ट्र भूषण कार्यक्रम संपन्न झाल्याने अनेकांना उन्हाचा त्रास झाला. मुख्यमंत्र्यांना ही माहिती मिळाल्यानंतर तातडीने मुख्यमंत्री श्री सेवकांची चौकशी करण्यासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT