Maharashtra Express will now run only till Pune news sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Express: महाराष्ट्र एक्स्प्रेस आता केवळ पुण्यापर्यंत धावणार; डबल लाईनचे काम

नॉन इंटरलॉकिंग कामासाठी काही रेल्वे गाड्यांचे रद्दीकरण व शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्याचे रेल्वे विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra Express : नॉन इंटरलॉकिंग कामासाठी काही रेल्वे गाड्यांचे रद्दीकरण व शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्याचे रेल्वे विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

गाडी क्रमांक ११४०३ व ११४०४ नागपूर - कोल्हापूर एक्सप्रेस ही ३० डिसेंबरपासून काही दिवस रद्द करण्यात आली आहे. पुणे विभागातील सांगली- मिरज दरम्यान डबल लाइनच्या कार्यासाठी ‘नॉन इंटरलॉकिंग’चे कार्य घेण्यात येत आहे. (Maharashtra Express will now run only till Pune news)

त्यामुळे काही मेल एक्सप्रेस गाड्या एकतर रद्द किंवा त्यांचे मार्ग कमी करण्यात आले आहे. भुसावळ विभागातील काही गाड्यांवर परिणाम होणार आहे.

गाडी क्रमांक ११४०३ नागपूर - कोल्हापूर एक्सप्रेस (अकोलामार्गे) ही गाडी ३० डिसेंबर २०२३, २ जानेवारी २०२४, ६ जानेवारी २०२४ या दिवशी रद्द करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक ११४०४ कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस अकोला मार्गे ही २९ डिसेंबर २०२३, १ जानेवारी २०२४, ५ जानेवारी २०२४ पर्यंत रद्द करण्यात येत आहे.

गाडी क्रमांक ११०४० गोंदिया - कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस ही आजपासून (२५ डिसेंबर) ते ५ जानेवारी २०२४ पर्यंत पुणे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. गाडी पुणे ते कोल्हापूर पर्यंत रद्द राहील.

गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस ही २६ डिसेंबर २०२३ ते ६ जानेवारी २०२४ पर्यंत पुणे स्थानकापासून आपल्या नियोजित वेळेत सुटेल. गाडी कोल्हापूर ते पुणे रद्द राहील. प्रवाशांना या बदलाची नोंद घ्यावी, असे रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayan Ahmed: एक सल्ला, नंतर 'तो' मॅसेज अन् सापळा... अयान अहमदनं तरुणींना जाळ्यात कसं ओढलं? पडद्यामागचा सल्लागार लव्हगुरू कोण?

RCB vs DC Live: विराट कोहली अपयशी ठरला, वैभव सूर्यवंशीचा 'पॉवर'फुल विक्रम थोडक्यात वाचला! १५ वर्षीय फलंदाज वरचढ ठरला

Inflation Rise: IMD चा कमी पावसाचा इशारा! शेती संकटात? महागाई वाढणार का?

Latest Marathi News Live Update: ठाण्यातील टेंभी नाका आनंद आश्रम येथे शिवसेना जाहीर निषेध आंदोलन

बिग बॉस मराठीच्या घरात गायक अभिजीत सावंतची ENTRY ! घरातील स्पर्धकांना केलं गाण्याने मंत्रमुग्ध ..

SCROLL FOR NEXT