MHT-CET Exam sakal media
महाराष्ट्र बातम्या

आरोग्य विभाग परीक्षा प्रकरण: न्यासा कंपनीने केला खुलासा

कंपनीच्या चुकीमुळे हे सर्व घडल्याचा आरोप होत आहे.

सुरज सावंत

मुंबई: मागच्या आठवड्यात ऐनवेळी आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द (maharashtra medical exam) करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये (students) रोषाची भावना आहे. विद्यार्थ्यांनी ही परिक्षा देण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास केला होता. त्यामुळे परिक्षा (exam) रद्द करण्याचा निर्णय अचानक का घेतला? एक-दोन दिवस आधी का नाही निर्णय घेतला? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. ऐनवेळी आरोग्य विभागाची परीक्षा रद्द होण्यासाठी न्यासा कंपनीला जबाबदार धरण्यात येत आहे.

"आत यावर न्यासा कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. परीक्षार्थींनी अफवा आणि असत्य माहितीवर विश्वास ठेवू नये. न्यासा कम्युनिकेशन कंपनी कधीही ब्लॅक लिस्टेड नव्हती आणि नाही. महाआयटी विभागाच्या सर्व निकषांची न्यासा कम्युनिकेशनकडून पूर्तता करण्यात आली होती. परीक्षा पुढे ढकलण्यामागे परीक्षार्थी़चे व्यापक हित हाच एकमेव हेतू आहे" असे न्यासाने आपल्या खुलाशामध्ये म्हटले आहे.

कंपनीच्या चुकीमुळे हे सर्व घडल्याचा आरोप होत आहे. दरम्यान न्यासा कंपनीविरोधात हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्या होत्या. उत्तर प्रदेशात पेपर लीक करण्याचा तर हरियाणात निकालात गोंधळ घातल्याचा आरोप होता. पंजाबमध्ये ब्लॅकलिस्ट केल्यानंतर कंपनीने कोर्टात धाव घेतली होती. ही सर्व कागदपत्र साम टीव्हीच्या हाती लागली आहेत. त्यामुळे अशा कंपनीला कंत्राट का दिलं? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: काँग्रेसने विधेयकाची भ्रूणहत्या केली, पापाची शिक्षा नक्की मिळेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला संबोधन

SRH vs CSK Live: संजू सॅमसनचा एक निर्णय अन् गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याने हैदराबादचे नशीब बदलून टाकले; चेन्नईने कमबॅक केले

SRH vs CSK Live: अभिषेक शर्माला 'चिटींग' करायची होती, पण संजू सॅमसनने चोरी पकडली; IPL 2026 मध्ये आणखी एक ड्रामा, Video

IPL 2026 News: विराट कोहलीच्या stunning catch वर व्हायरल होतेय अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन; Video

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

SCROLL FOR NEXT