Jayant Patil 
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil Statement: विरोधी पक्षनेता कोणाचा होणार? जयंत पाटील यांचे मोठे विधान

Sandip Kapde

Jayant Patil:  राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदारांनी भाजप आणि शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान आता विरोधी पक्षनेता कुणाचा हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. संख्याबळाचा विचार केला तर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होईल असं मला वाटतं, संख्याबळ आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे विधीमंडळातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस असेल, असे जयंत पाटील म्हणाले.  

राज्यकारभार लवकर सुरू केला पाहीजे. राज्यकारभाराकडे सरकारचे लक्ष नाही, त्यांनी लक्ष दिले पाहीजे. भाजपने नवीन सहकारी सबोत घेतले त्यांना देखील मंत्रिपदे मिळाले नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांच्या आघाडीमुळे शरद पवार यांच्या अडचणी निश्चितच वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील कथित ऑपरेशन लोटस अयशस्वी करण्यासाठी शरद पवार यांनी ५ योद्धे तैनात केले आहेत. हे सर्वजण पवारांची रणनीती जमिनीवर राबवण्यासाठी कामाला लागले आहेत.

पाटील म्हणाले, शपथविधी होऊनही मंत्र्यांचे खातेवाटप झालं नाही ही चिंतेची बाब आहे. येत्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांना अभ्यासाची गरज आहे. विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्यांना तयारी करणे गरजेचे आहे.कोणी आमदार नाराज असेल तर त्यांनी लोकांपुढे येऊन आपली नाराजी व्यक्त केली तर ते सगळ्यांना माहित होईल. 

मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातील गुन्हेगारांना फोन जातात ही संजय राऊतांची माहिती खरी असेल तर ते गंभीर आहे.” असे जयंत पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam 104.28 TMC Water Storage : कोयना धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! फक्त 0.97 TMC पाण्याची गरज; पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग सुरू

हेली दारूवालाचा ‘लव्ह लॉटरी’मध्ये नवा अवतार; कोर्टरूम थ्रिलरमध्ये साकारली गुंतागुंतीची भूमिका

Kolhapur ZP Teacher Recruitment: जिल्हा परिषदेच्या शाळांत ४४५ नवीन शिक्षक रुजू होणार

Marathi News Live Updates : वीर धरणातून नीरा नदीपात्रात 1100 क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Maratha Reservation Protest: गोंधळ घालून सरकारला केले आवाहन मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सकल मराठा समाजाचा अनोखा जागर

SCROLL FOR NEXT