Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: मध्यरात्री फडणवीस वर्षा बंगल्यावर; राजकीय घडामोडींना वेग

लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग

धनश्री ओतारी

लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. दोघांच्या भेटीत नेमकं काय घडलं हे अद्याप समजलं नाही. पण राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.(maharashtra politics Devendra Fadnavis meets Eknath Shinde at midnight )

शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षात सारं काही अलबेल नसल्याचं चित्र समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर दोघांमध्ये बैठक झाली का? नेमकं काय घडलं? असे अनेक सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत.

अशातच भाजपच्या सावत्र वागणुकीला कंटाळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे २२ आमदार आणि नऊ खासदार पक्ष सोडू शकतात असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

काही दिवसांपूर्वी, भाजप आम्हाला सापत्न वागणूक मिळते असा आरोप गजानन किर्तीकर यांनी केला होता. यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला याबाबत माहिती नाही, पण असा त्यांनी काय प्रश्न केला असेल तर त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विचार करतील”, असं मुनगंटीवार म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चूक नसतानाही प्राचार्यांकडून सर्वांसमोर पाईपने मारहाण, अपमान जिव्हारी; १९ वर्षीय विद्यार्थ्यानं संपवलं आयुष्य

Tom Bruce: सहसदस्य देश केवळ विश्वकरंडकापुरतेच मर्यादित; स्कॉटलंडच्या टॉम ब्रुसची खंत!

Priyank Kharge : 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा दैत्यासारखा, भाजप त्या दैत्याची सावली'; काँग्रेस अध्यक्षांच्या मुलाची जहरी टीका

Kolhapur City :हद्दवाढीशिवाय विकास नाही! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्पष्ट संकेत; केंद्राच्या योजनांसाठी कोल्हापूरला विस्तार आवश्यक

Latest Marathi News Live Update : मंत्री नरहरी झिरवळ यांच्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज

SCROLL FOR NEXT