Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: जागावाटपावरून काँग्रेस-ठाकरे गटात मतभेद! राज्यातील ३ नेते हायकमांडला भेटणार

Sandip Kapde

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या बैठका सुरू आहेत. राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप असा सामना रंगणार आहे. मात्र, महाविकास आघाडीत जागावाटपावरुन गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप आघाडीत चर्चा झाली नाही. मात्र काँग्रेस पक्ष तयारीला लागला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "लवकरच हे प्रकरण निकाली काढले जाईल. २१ रोजी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आहे, त्यात आम्ही आमचे ३ नेते पाठवू. सर्व जागा गुणवत्तेच्या आधारावर ठरवल्या जातील आणि समितीमध्ये चर्चा होईल.

विजय वडेट्टीवार म्हणाले, शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकित प्राथमिक जागावाटपावर चर्चा झाली आहे. काँग्रेस हायकमांड जागावाटपावर पुढचे सुत्र ठरवेल. महाराष्ट्रात भाजपचे पाणीपत झाल्याशिवाय राहणार नाही.

महाविकास आघाडी होणार हे नक्की आहे. मात्र जागावाटप हायकमांड ठरवणार आहे. तीनही पक्ष ठरवतील. कोणीतरी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपला महाविकास आघाडी होऊ नये, असे वाटते.

जागावाटपाबाबच फॉर्म्युला अजून ठरला नाही मात्र २०१९ मध्ये जिंकलेल्या जागा आम्हीच लढणार, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. यावर जागावाटपात निवडून कोण येईल, हा विषय महत्वाचा असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT