Maharashtra politics election commission allotted uddhav thackeray eknath shinde group party symbol and names  
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या हातात 'मशाल', तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' नाव

रोहित कणसे

मुंबई: शिवसेनेचे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं आणि शिवसेना हे नाव वापरण्यास मनाई केल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला कोणतं चिन्ह आणि नाव मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर निवडणूक आयोगाने आज याबद्दलचा निर्णय दिला आहे.

उद्धव ठाकरे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 'मशाल' हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' असे नाव देण्यात आले आहे. यासोबतच एकनाथ शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान अद्याप शिंदे गटाला कोणतेही चिन्ह मिळालं नाहीये. आयोगाकडून नवीन तीन चिन्हे सूचवा असे शिंदे गटाला सांगण्यात आले आहे.

रविवारी सायंकाळी बोलतांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला पर्यायी नावं आणि चिन्हंदेखील त्यांनी दाखवून दिले होते. त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल या चिन्हांचे फोटो उद्धव ठाकरेंनी दाखवले होते. शिवाय नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही पर्यायी नावं निवडणूक आयोगाला दिली होती.

तसेच निवडणूक आयोगाला शिंदे गटाने सादर केलेल्या नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय देण्यात आले होते यापैकी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाचा प्रस्ताव ठाकरे गटानेदेखील दिला होता. शिंदे गटाने बंड केल्यानंतर आम्हीच खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत होता. त्याचे प्रतिबिंब शिंदे गटाने दिलेल्या नावाच्या पर्यायात दिसून आले होते. यापैकी बाळासाहेबांची शिवसेना हे नाव शिंदे गटाला मिळालं आहे.

शिंदे गटाला तीन नवीन चिन्ह सादर करावे लागणार आहेत, उद्या सकाळी १० वाजेपर्यंत सादर करायचे आहेत. शिंदे गटाने त्रिशुळ, उगवता सुर्य आणि गदा हे चिन्ह निवडणूक आयोगाला सादर केले होते. दुसरीकडे ठाकरे गटाने त्रिशुळ, उगवता सुर्य आणि मशाल हे चिन्ह सादर केले होते. दरम्यान निवडणूक आयोगाने दोनही गटाची धार्मिक चिन्ह रद्द केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून विश्‍वासघात केला’: बाळासाहेब थोरातांचा आरोप, निवडणुकीनंतर महिलांना दिला धक्का

Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांच्या हातात अजिबात टिकत नाही पैसा, नको तिथे अति खर्च करून गरजेच्या वेळी होतात कंगाल

तोंड झाकलं की थेट रेड कार्ड! FIFA World Cup पूर्वी हे नवे नियम होणार लागू; खेळाडूंच्या टाईमपासला बसणार लगाम

Latest Marathi News Live Update : शिवराज्याभिषेक परवानगीच्या मागणीसाठी तुळजापुरात मराठा क्रांती मोर्चाचा जिल्हाधिकाऱ्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT