Shinde, Pawar & Fadanvis esakal
महाराष्ट्र बातम्या

Loksabha Election : महायुतीमध्ये शिंदे गटाचा लोकसभेसाठी 18 जागांसाठी आग्रह!

Political News : राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांची महायुती असल्याने यामध्ये जागावाटप कसे होणार अशी उत्सुकता राज्याला लागून राहिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांची महायुती असल्याने यामध्ये जागावाटप कसे होणार अशी उत्सुकता राज्याला लागून राहिली आहे.

मात्र शिंदे गटाच्या झालेल्या बैठकीत १२ जागांच्या फार्म्युल्यावर खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. शिवसेनेनं १८ जागा लढवाव्यात, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला असल्याचे समजते. (maharashtra politics Lok Sabha Election Shinde group marathi news)

शिंदे गटाला १२ जागा तर अजित पवार गटाला मात्र चारच जागा मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यावरूनच हा फॉर्म्युला ठरण्याआधीच शिंदे यांची भेट घेत बारा जागांसाठी ना पसंती व्यक्त केली आहे. आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये १८ जागा लढवाव्या, अशी मागणी ही शिंदे गटाच्या नेत्यांनी शिंदे यांच्याकडे केली आहे.

राज्यात लोकसभेसाठी महायुतीचं जागावाट भाजप २८ ते ३२ जागापर्यंत तर शिंदेगट १२ ते १६ आणि अजित पवार गटाला ४ ते ८, या आकडेवारीनुसार कमी जास्त प्रमाणात होण्याची चिन्हे आहेत. या तिन्ही पक्षांकडून याबद्दल अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाऊ शकते.

पण अद्याप महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला नाही, केवळ चर्चा झाल्या आहेत. बोलणी सूरू आहे. ज्याच्याकडे ज्या जागा आहेत. त्या गृहित मानल्या जातील. त्यात फेरबदल करायचे म्हटल्यास चर्चेला वाव असल्याचे प्रत्येक पक्षातील वरिष्ठ माहिती देत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Prices: करमुक्त साखरेच्या आयातीस मुदतवाढ ;भाव स्थिर राहणार; आयातदारांना दिलासा

Pune Weather : पुणेकरांना उकाड्यापासून मिळणार दिलासा; पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात घट होण्याची शक्यता

Sinhgad Road Traffic : सिंहगड रस्त्यावर चार किलोमीटर रांगा; वडगाव पूल ते गणेशमळादरम्यान कोंडी

Ambad Crime : अंबड -घनसावंगी मार्गावरील पांगरखेडा फाट्यालगत धारदार शस्त्राने युवकाचा खून

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

SCROLL FOR NEXT