Lok Sabha Election Esakal
महाराष्ट्र बातम्या

Lok Sabha Election: लोकसभेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; शिंदे गटाला 12 तर अजित पवार गटाला किती जागा मिळणार?

Maharashtra politics: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट होणार आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Lok Sabha Election Seat: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट होणार आहे. महायुतीला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न सुरू केले असतानाच दुसरीकडे महायुतीने जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, जागावाटपाचा फॉर्म्युल्याबाबत अद्याप कोणत्याही नेत्यांनी अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार जो फॉर्म्युला समोर आला. त्यानुसारच महायुतीच्या जागावाटपचं सूत्र असेल. अपेक्षेप्रमाणे भाजपला जास्त जागा मिळणार आहेत.

भाजप महाराष्ट्रातील ३२ जागांवर लोकसभेची निवडणूक लढवणार, असल्याची माहिती आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला फक्त १२ तर अजित पवार गटाला लोकसभेच्या ४ जागा मिळण्याची शक्यता आहे.

भाजपने (BJP) या आधी लोकसभा २०१९ निवडणुकीत लोकसभेच्या २६ जागा लढवल्या होत्या. तर शिवसेनेने २२ जागांवर निवडणूक लढवली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला फक्त १२ जागा मिळणार असल्याची चर्चा आहे. सध्या शिवसेनेच्या विद्यमान १८ खासदारांपैकी १३ खासदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. अशातच शिंदे गटाला लोकसभेच्या फक्त १२ जागाच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कुणाचं तिकीट कापलं जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे अजित पवार गटाला लोकसभेच्या ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाकडे सध्या ३ खासदार आहेत. तरीही आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या वाटेला ४ जागा येणार असल्याने शिंदे गट नाराज होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport: पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात; लँडिंग करताना गिअर निकामी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १८ एप्रिल २०२६ ते २४ एप्रिल २०२६ - मराठी राशी भविष्य

Weekend Special Breakfast : वीकेंडला 10 मिनिटांत बनवा झटपट, हेल्दी आणि जबरदस्त टेस्टी ओट्स उत्तप्पम!

Panchang 18 April 2026 : आजचे पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि ग्रहस्थिती जाणून घ्या एका क्लिकमध्ये

आजचे राशिभविष्य - 18 एप्रिल 2026

SCROLL FOR NEXT