NCP Crisis Esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis: अजित पवारांना विधानसभेच्या तोंडावर बसणार मोठा धक्का? तब्बल १४ नगरसेवकांनी घेतली शरद पवारांची भेट

NCP Crisis: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतअपेक्षित यश न मिळाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते शरद पवारांकडे परत येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. अशातच राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतअपेक्षित यश न मिळाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते शरद पवारांकडे परत येणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच काल (शनिवारी) पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या १४ नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची मोठी माहिती समोर आली आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटामध्ये जोरदार इनकमिंग होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 14 नगरसेवकांनी काल पुण्यातील मोदी बागेमध्ये शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी 11 वाजता पुन्हा एकदा नगरसेवक आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाल्याची माहिती आहे आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास 36 माजी आजी-माजी नगरसेवक शरद पवार गटांच्या संपर्कात असल्याची माहिती साम टिव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडेही आज शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच शरद पवार पुन्हा एकदा अजित दादांना धक्का देणार का? हे ही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भेटीवर शरद पवारांची प्रतिक्रिया

आज पिंपरी चिंचवडच्या काही नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, मला हल्ली रोज दोन ते तीन तास पक्षात येणाऱ्या नवीन लोकांना भेटायला वेळ द्यावा लागतो. नगरसेवकांनी आज भेट घेतली. येणाऱ्यांचं आम्ही स्वागत करतो. नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT