Maharashtra Rain news 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Update: राज्यात 24 सप्टेंबरपासून चार दिवस मुसळधार पाऊस; मुंबईला सतर्कतेचा इशारा, विदर्भात यलो अलर्ट

Maharashtra Weather Update News: मुंबईमध्ये २४ ते २९ सप्टेंबर असे पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई, उपगनर आणि ठाणे परिसरात जोराचा पाऊस पडेल.

कार्तिक पुजारी

Maharashtra Weather Update: काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईमध्ये २४ ते २९ सप्टेंबर असे पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई, उपगनर आणि ठाणे परिसरात जोराचा पाऊस पडेल.

पूर्व विदर्भात देखील पाऊस आपली हजेरी लावेल. नागपूरमध्ये २४ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील काही भागात २४ सप्टेंबरपासून पुढचे चार दिवस पावसाच्या जोरदार सरी पाहायला मिळू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. मराठवाडा, विदर्भात चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २२ सप्टेंबरला राज्यात पावसाची शक्यता नाही. पण, २३ सप्टेंबरला मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर २४ तारखेपासून राज्यात पावसाचा जोर वाढेल. २७ सप्टेंबरपर्यंत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला आहे.

देशात मॉन्सूनची स्थिती काय?

येत्या दोन दिवसांत वायव्य भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. २३ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. २३ सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थान आणि कच्छच्या काही भागांतून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. या भागांतून मॉन्सून माघारी फिरण्याची सर्वसाधारण तारीख १७ सप्टेंबर आहे. बंगालच्या उपसागरात २३ सप्टेंबरला कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता. त्यामुळे महाराष्ट्रात २३ - २६ सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत! कोण आहे रितेश हांगे? गुन्ह्यातला मास्टरमाईंड बीडचा?

Manchar News : २५ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, दीड महिन्यापूर्वी झालेलं लग्न; पत्नीसह कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Mangalwedha News : दामाजीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आंदोलन 22 व्या दिवशी मागे

Marathi News Live Updates: एकनाथ शिंदे फाऊंडेशन २ विद्यार्थ्यांचा दहावीपर्यंत सगळा खर्च करणार

Sonam Wangchuk : तर सोनम वांगचुक भारतातील सर्वात मोठ्या आंदोलनाच्या तयारीत; सरकारने मागणी मान्य न केल्यास काय होणार?

SCROLL FOR NEXT