Giriraj-Singh 
महाराष्ट्र बातम्या

सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र चौथ्या स्थानावर

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र देशात चौथ्या स्थानावर असून राज्याच्या मत्स्य उत्पादनात वाढ झाल्याचे चित्र आहे. केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री गिरीराज सिंह यांनी आज येथील मीडिया सेंटरमध्ये देशातील मत्स्य क्षेत्राची इत्यंभूत माहिती असणाऱ्या सांख्यिकी  पुस्तिका -२०१८चे  प्रकाशन केले. या पुस्तिकेत वर्ष २०११-१२ ते २०१७-१८ पर्यंतची देशातील मत्स्य क्षेत्राशी निगडीत विविध बाबींची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सागरी मत्स्य उत्पादनात राज्य चौथ्या स्थानावर आहे.

समुद्राच्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राने पहिल्या पाच राज्यांमध्ये स्थान मिळवले आहे. वर्ष २०१७-१८ मध्ये राज्यात समुद्राच्या पाण्यातील मत्स्य उत्पादन ४ लाख ७५ हजार टन असून महाराष्ट्र देशात चौथ्या स्थानावर आहे. ७ लाख १ हजार टन उत्पादनासह गुजरात पहिल्या, ६ लाख ५ हजार टन उत्पादनासह आंध्र प्रदेश दुसऱ्या तर ४ लाख ९७ हजार टन उत्पादनासह तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे.

मत्स्य उत्पादनात २७ हजार टनांची वाढ
राज्यात गोड्या आणि समुद्राच्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात  वाढ झाल्याचे चित्र आहे. वर्ष २०११-१२ मध्ये राज्यात गोड्या आणि समुद्राच्या पाण्यातील मत्स्य उत्पादन ५ लाख ७९ हजार टन होते तर वर्ष २०१७-१८ मध्ये मत्स्य उत्पादनात २७ हजार टनांची  वाढ होऊन एकूण उत्पादन ६ लाख ६ हजार टन एवढे झाले आहे. वर्ष २०११-१२ पासून प्रत्येक वर्षी राज्याच्या मत्स्य उत्पादनात वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : राज्यातील धरणे १०० टक्के भरणार? पुढील चार दिवस कसे राहणार; हवामान विभागाचा ताजा अंदाज

Supreme Court: केवळ आंदोलन आहे म्हणून लाठीमार योग्य नाही; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला सुनावले, आंदोलनाचा अधिकार अबाधित

NEET Result: कऱ्हाडमध्ये ‘नीट’मधील अपयशामुळे मुलीने जीवन संपवले; निकालानंतर होती तणावात..

Khadakwasla Dam: खडकवासला धरणसाखळी ९० टक्के भरली; पानशेतमधून वीज निर्मितीसाठी प्रथमच ६०० क्युसेक विसर्ग, मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Ragi Uppu Urundai Recipe: नाचणी सत्त्व विसरा! फक्त 1 कप नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ, चविष्ट उप्पू उरुंडई; नाश्ता आणि टिफिनसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT