कोरोना sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात कोरोना वाढताच; सर्वाधिक रूग्णांची नोंद मुंबईत

दिलासादायक बाब म्हणजे राज्यात गेल्या 24 तासांत एकही कोरोना रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीचा आलेख काही केल्या कमी होताना दिसत नसून, गेल्या 24 तासांत राज्यात 2,922 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1,392 रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात गेल्या 24 तासांत एकही कोरोना रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. दरम्यान, आज नोंदवण्यात आलेल्या रूग्णांपैकी 1,765 कोरोना रूग्ण एकट्या मुंबईत नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. (Maharashtra Corona Update News)

दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.00 टक्क्यांवर नोंदवण्यात आले असून, मृत्यूदर 1.87 टक्के इतका झाला आहे. दिवसागणिक वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे राज्यातील सक्रीय रूग्णांची संख्येतदेखील मोठी वाढ झाली आहे. सध्या राज्यात 14,858 सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत सर्वाधिक म्हणजे 10,047 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

देशात सक्रीय रूग्णांची संख्या 40 हजार पार

भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसून येत असून, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 8,329 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे 10 टक्क्यांनी वाढले आहे. 7 जून रोजी देशात दैनंदिन रुग्णांची संख्या पाच हजारांच्या पुढे होती, आता ही संख्या आठ हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

दिवसागणिक वाढत जाणाऱ्या आकडेवारीनंतर देशातील कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या आता 40,370 वर पोहोचली असून, गेल्या चोवीस तासांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी 0.09 टक्के आहे, तर कोविड-19 मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.69 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. देशातील कोरोना संसर्गाचा दैनंदिन दर 2.41 टक्के आणि साप्ताहिक संसर्ग दर 1.75 टक्के इतका नोंदवला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT