ST employees esakal
महाराष्ट्र बातम्या

ST कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! सुधारित वेतनवाढीनुसार उद्या होणार पगार

अनिल परब यांच्या बैठकीत निर्णय

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर असून उद्या कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे. विशेष म्हणजे हा पगार सुधारित वेतनवाढीनुसार होणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतलेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला असल्याचं सुत्रांकडून कळतं.

एसटी महामंडळाच्या मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयात परिवहन मंत्री अनिल परब यांची अधिकाऱ्यांसोबत गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु आहे. या बैठकीत कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनानुसार पगार करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळं नियमित कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांचा उद्या सुधारित वेतनानुसार पगार होणार आहे. सध्या १९ हजार कर्मचारी आंदोलनानंतर कामावर रुजू झाले आहेत. अजूनही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामावर हजर होणं बाकी आहे.

जे कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत किंवा ज्यांचं निलंबन करण्यात आलं आहे, अशा एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबतही अनिल परब यांच्या बैठकीत चर्चा झाल्याचंही कळतं, त्यामुळं ही बैठक समाप्त झाल्यानंतरच बाबात सर्व बाबी स्पष्ट होऊ शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT