Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: विदर्भात अवकाळी पावसासह गारपीट; आजही 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Weather Update: राज्याच्या काही भागात मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे. विदर्भासह, मराठवाड्यात रविवारी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Weather Update: राज्याच्या काही भागात मुसळधार पावसासह गारपीट झाली आहे. विदर्भासह, मराठवाड्यात रविवारी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काल(रविवारी) अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं, फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, आजही राज्याच्या काही भागात पावसाची आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्याच्या काही भागात आज पावसाची आज शक्यता आहे. मंगळवारी मराठवाड्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज यवतमाळ, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा अंदाज आहे. या तिन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. इथे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

गोंदिया जिल्ह्यात रविवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मुसळधार पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा पश्चिम बंगालपासून आंध्र प्रदेशापर्यंत तसेच, मराठवाड्यापासून कर्नाटक, तामिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत सक्रिय आहे. यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील वातावरणात मोठा बदल झाला आहे. तापमानात घट झाल्याने हवेत गारवा निर्माण झाल्याने पावसासाठी पोषण वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून उपराजधानीत वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे अनेक झाडे कोसळली असून वाऱ्याच्या वेगामुळे काहींच्या घरावरील पत्रे उडून गेली आहेत. दरम्यान, हवामान खात्याने गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूरला जिल्ह्याकरिता १७ ते १९ मार्चपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT