Maharashtra Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यासह 'या' भागात अवकाळी पावसाचे संकट कायम, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather Update: वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे अनेक राज्याच्या हवामानात मोठा बदल झाला असल्याचं दिसून येत आहे. आजही देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या अनेक भागात अनकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही भागातील शेती पिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे अनेक राज्याच्या हवामानात मोठा बदल झाला असल्याचं दिसून येत आहे. आजही देशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.

आज विदर्भ, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे ढग कायम असून या भागात तुरळक पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासात हिंगोली, परभणी, बीड अमरावती या भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये गारवा वाढला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या परिणामामुळे 7 मार्चला जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर काश्मीर खोऱ्यांमध्ये आज जोरदार बर्फवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंड भागातही आज पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासात देशाच्या विविध भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. देशासह राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT