विधानभवन e sakal
महाराष्ट्र बातम्या

हिवाळी अधिवेशन मुंबईत! २२ ते २९ डिसेंबरला होणार अधिवेशन

रामनाथ दवणे

मुंबई : हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Assembly Session 2021) नागपूरला होणार की मुंबईला यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील अधिवेशनाबाबत मतभेद दिसून येते होते. अखेर अधिवेशनाची तारीख ठरली असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईमध्ये हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Assembly Session 2021 Mumbai) होणार आहे. याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. तसेच एक पत्र देखील व्हायरल झालं होतं. पण, अधिवेशनाबाबत अधिकृत निर्णय झाला नव्हता. आता हे अधिवेशन २२ ते २९ डिंसेबरला होणार असल्याचं समजते आहे. याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

शिवसेनेचा सुरुवातीपासूनच नागपूर अधिवेशनाला विरोध आहे. मात्र, काँग्रेस आणि भाजप हिवाळी अधिवेशन नागपूरलाच घ्यावे यासाठी आग्रही होतं. त्यामुळे अधिवेशन नागपूरला घ्यावं की मुंबईला यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद होते. तसेच चार-पाच दिवसांच्या अधिवेशनावर कोट्यवधींचा खर्च करण्याऐवजी तेवढा निधी विदर्भाला उपलब्ध करून देण्याची तयारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शवली आहे. आता हे अधिवेशन मुंबईतच होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! स्व. अजित पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार; शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश

IND vs ENG: लाईव्ह मॅचमध्ये धोनीचा हटके स्वॅग! चिमुकल्या फॅनला दिली आयुष्याभरासाठी सर्वात मोठी आठवण, Video तुफान व्हायरल

Jalgaon Jamod ACB Action : जळगाव जामोद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीपकुमार मोरे २५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात; कार्यालयातच रंगेहात अटक

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, बँक खातं तपासा! लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात

Kudankulam Data Leak: देशाच्या अणुसुरक्षेला मोठा धोका? भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा लीक; कुडनकुलम प्रकरण नेमकं काय आहे?

SCROLL FOR NEXT