Mahavikas Aghadi News 
महाराष्ट्र बातम्या

Mahavikas Aghadi News: मविआची डिनर डिप्लोमसी... शरद पवारांसह दोन्ही पक्षातील नेत्यांनी बोलावल्या बैठका!

Sandip Kapde

Mahavikas Aghadi News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ५ ऑगस्टला महाविकास आघाडीची बैठक बोलावली आहे. आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला. या सोहळ्यात शरद प्रमुख पाहुणे होते. पवारांनी या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावल्यामुळे इंडिया आघाडीतील अनेक नेते नाराज आहेत. त्यामुळे शरद पवार या नेत्यांची नाराजी दूर करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

५ ऑगस्टला मुंबईत नेहरु सेंटर इथं सकाळी ११ वाजता महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. बैठकीत विरोधकांची आघाडी INDIA आणि महाविकास आघाडीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदा महाविकास आघाडीची बैठक होत आहे.

शरद पवार यांनी स्वत: ही बैठक बोलावली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील  सभा आणि प्रचार कसा असेल, याबाबत बैठकीत नियोजन होणार असल्याची चर्चा आहेत.

तसेच उद्या सायंकाळी ७ वाजता शिवसेना नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वतीनं गरवारे क्लब इथं मविआच्या सर्व आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तर बुधवार दिनांक ३ ॲागस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावतीने ताज हॅाटेल, कुलाबा इथं मविआ आमदारांसाठी स्नेहभोज आयोजित करण्यात आले आहे.

महाविकास आघाडीच्या तीन बैठका होणार आहेत. आघाडीतील तिन्ही पक्षांनी बैठकांचे आयोजन केले आहे. आघाडीत आपले अस्तित्व निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाचे अंबादास दानवे, काँग्रेसकडून नाना पटोले  आणि राष्ट्रवादीकडून स्वत: शरद पवार यांनी बैठक बोलावली आहे.

उद्धव ठाकरे नाराज?

सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून आज शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासोबत पवारांनी एकाच व्यासपीठावर जाणे शिवसेनेला आवडलेले नाही. अग्रलेखातून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे शरद पवार उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करणार का?  हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण! Tata आणि Reliance ला फटका; ICICI Bank मात्र तेजीत

Bombay High Court: ईडीच्या कारवाईला धक्का; बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावरील जप्ती आदेश न्यायालयाकडून रद्द..

Latest Marathi News Live Update : बदलापूर पूर्वमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला गळती

NCP Sangli Crisis : सांगलीच्या राजकारणात खळबळ! 'राष्ट्रवादी'च्या 35 जणांचे राजीनामे; मैनुद्दीन बागवान यांच्याविरोधात बंड, स्वीकृत निवडीचा वाद

Pune Crime: उरुळीकांचनमध्ये गंभीर घटना; अल्पवयीन मुलावर जबरदस्तीचा प्रयत्न, POCSO कायद्यान्वये कारवाई!

SCROLL FOR NEXT