crime news esakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai Crime : 'आयटी'मधील महिलेचा सार्वजनिक शौचालयात व्हीडिओ केला; नवी मुंबईतल्या घटनेने खळबळ

सकाळ डिजिटल टीम

नवी मुंबईः नवी मुंबईतल्या बेलापूर येथे एक धक्कादायक घडना घडली आहे. सार्वजनिक शौचालयात एका महिलेचा व्हीडिओ शूट केल्याप्रकरणी एका २४ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेलापूर येथील किल्ला जंक्शन येथील एनएमएनसी मुख्यालयाबाहेर सार्वजनिक शौचालय आहे. येथेच राजस राणे या तरुणाने हे कृत्य केलं. पीडित महिला आयटी सेक्टरमध्ये काम करते. बुधवारी रात्री घराकडे जात असतांना तिने सार्वजनिक शौचालयाचा वापर केला. त्याचवेळी शेजारच्या पुरुषांच्या शौचालयातून कुणीतरी रेकॉर्डिंग करत असल्याचं तिला दिसलं.

तक्रारदार महिलेचा पती बाहेर उभा होता. पत्नीने बाहेर आल्यानंतर सर्व हकीकत सांगितली. दोघांनीही बाहेर उभा राहून राणेची वाट बघितली. त्यांनी पोलिसांना पाचारण केले होतं. आरोपी बाहेर येताच त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी आरोपीचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये दोन व्हीडिओ आढळून आले. असे प्रकार तो नियमितपणे करत असल्याचं पोलिस तपासातून पुढे आले आहे. आरोपीविरुद्ध कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Buses Upgrade : राज्यात एसटी बसेसचे रुपडे पालटणार, बैठक व्यवस्था बदलून नव्याने ३ हजार बसेस रस्त्यावर धावणार

घरकुलचं अनुदान हवं असेल तर २५ हजार दे, अभियंत्याकडून मागणी; १० हजाराची लाच घेताना ACBने केली अटक

leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू; काळजाचा थरकाप उडवणारी घटना, आई-वडिलांच्या डोळ्यादेखत घेतला अखेरचा श्वास!

Latest Marathi News Live Update : वाशिममध्ये उष्णतेचा कहर; ४२°C पार तापमानामुळे छोट्या व्यवसायिकांवर मोठा परिणाम

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

SCROLL FOR NEXT