teacher dress code sakal
महाराष्ट्र बातम्या

Teachers Dress Code : राज्यातील सर्व शिक्षकांना ड्रेसकोडची सक्ती; पुरूष शिक्षकांना फिकट रंगाचा शर्ट आणि....

राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना विशिष्ठ प्रकारचा पेहराव ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना विशिष्ठ प्रकारचा पेहराव ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी आज मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या असून त्यात पुरूष शिक्षकांना फिकट रंगाचा शर्ट आणि गडद रंगाची पँट आणि महिला शिक्षिकांना साडी, चुडीदार, कुर्ता, दुपट्टाचा पेहराव असे निश्चित करण्यात आले आहेत.

यासोबतच शिक्षकांची समाजात एक वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी त्यांच्या वाहनांवर अथवा नावापुढे डॉक्टरांप्रमाणे शिक्षकांच्या वाहनांवर 'टीआर' अथवा मराठी 'टी' असा वेगळा उल्लेख केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली.

पेहरावाचा हा निर्णय राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अल्पसंख्यांक संस्था, अनुदानित, स्वयंअथसहाय्यित आणि इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना लागू होणार आहे. शिक्षकांची जनमानसात त्यांच्या वेशभूषेमुळे वेगळी ओळख व्हावी, असा हेतू यामागे असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.

शालेय शिक्षण विभागाने या पेहरावासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या असून त्यात सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा, त्यात महिलांनी साडी अथवा सलवार, चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा पेहराव करावा तर पुरूष शिक्षकांनी शर्ट, ट्राऊझर पँट आणि शर्ट इन करून तो परिधान करणे बंधनकारक आहे.

त्यात गडद रंगांचे व चित्रविचित्र नक्षीकाम, चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत शिवाय जीन्स, टी-शर्टचा वापर शाळांमध्ये करून नयेत असे आदेश शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहेत.

- शाळेने सर्व शिक्षकांसाठी एकच ड्रेस कोड ठरवावा

- पुरूष, महिला शिक्षकांच्या पेहरावाचा रंगही शाळेने निश्चित करावा

- पुरूष शिक्षकाच्या शर्टचा रंग फिकट, पँट गडद रंगाची असावी.

- पेहरावाला शोभतील असेच पादत्राणे शिक्षकांनी वापरावेत. पुरूष शिक्षकांनी शूजचा वापर करावा

- स्काऊट गाईडच्या शिक्षकांनी स्काऊड गाईडचेच ड्रेस वापरावेत

- शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा स्वच्छ, नीटनेटका असावा याची शिक्षकांची दक्षता घ्यावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT