Manoj Jarange File Photo esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Health Update : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली! पुन्हा लावलं सलाईन

Manoj Jarange Health Update Latest News : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे.

रोहित कणसे

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. काल बीड दौऱ्यावर गेल्यापासून त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचं जरांगे यांनी सांगितलं होतं. त्यानंतर जरांगे यांची डॉक्टरांकडून तपासणी केली जात आहे.

साम टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, सहा दिवस छत्रपची संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू होते. यानंतर डिस्चार्ज घेऊन जरांगे बीड जिल्ह्यात दौऱ्यावर गेले होते. यादरम्यान त्यांच्या कमेरला झटका बसला असं जरांगे यांनी सांगितलं होतं. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज अचानक मनोज जरांगे यांची तब्यत खालावली असून त्यांच्या हृदयाला ताण येऊन हृदय धडधडत असल्याचं जरांगे पाटील यांचं म्हणणं होतं. यानंतर डॉक्टरांनी वेगवेगळ्या तपासण्या करण्यास सुरूवात केली. सर्व तपासण्या केल्यानंतर निदान होईल असे सांगण्यात आले आहे. यावेळी जरांगे यांची टुडी इको, ईसीजी, सोनोग्राफी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या आहेत. तसेच जरांगेंना पुन्हा सलाईन देखील लावण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बिपिन बाफना खून प्रकरणी आरोपींना ३० वर्षांचा कारावास, हायकोर्टाकडून फाशीची शिक्षा रूपांतरित

डायबिटीज पेशंट्ससाठी Good News! आता आठवड्यातून फक्त एकदाच घ्यावं लागणार इन्सुलिन इंजेक्शन; भारतात आलं नवं इन्सुलिन

Latest Marathi News Live Update : ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी न्यूझीलंडकडे रवाना

Pune Metro Record Ridership : आषाढी वारीत पुणे मेट्रोचा नवा विक्रम; एकाच दिवशी तब्बल ३.५२ लाख प्रवाशांनी केला प्रवास

Mumbai–Pune Trains: मुंबई-पुणे मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या रद्द; मात्र 'या' दोन एक्स्प्रेस सुरू, पुणे रेल्वे स्थानकाकडून माहिती

SCROLL FOR NEXT