Manoj Jarange esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : मनोज जरांगे आजपासून पुन्हा मैदानात! राज्यातील १३ जिल्ह्यांचा करणार दौरा

रोहित कणसे

मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे हे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार आहेत. राज्यातील१३ जिल्हात होणाऱ्या या दौऱ्याची सुरूवात जालन्यातील अंतरवली सराटी गावातून केला जाणार आहेत. या दौऱ्याचा पहिला थांबा हा परभणीच्या जिंतूर येथे होणार आहे.

मनोज जरांगे हे जालना जिल्ह्यासोबतच संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. यानंतर मराठवाड्याबाहेर सोलापूर, नगर, नाशिक, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यात देखील मनोज जरांगे दौरा करणार आहेत.

मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेला ४० दिवसांच्या वेळेमधील ३० दिवस १४ ऑक्टोबर रोजी संपणार आहेत. यापूर्वी जरांगे यांनी जाहिर केल्याप्रमाणे मनोज जरांगे १४ तारखेला मराठा समाजाची जाहीर सभा घेणार आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्यातील सर्व मराठा समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी मनोज जरांगे यांचा हा दौरा असल्याचे सांगितले जात आहे.

या संपूर्ण दौऱ्यामध्ये मनोज जरांगे यांच्याकडून राज्यातील मराठा समाज बांधवांना शांततेचं अवाहन करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी यापूर्वीच सांगितले आहे. तसेच १४ ऑक्टोबर रोजी अंतरवली सराटी गावात होणाऱ्या सभेसाठी देखील ते १३ जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांना अवाहन करतील. मराठा समाजाला एकत्र करण्यासाठी मनोज जरांगे यांचा हा दौरा होत असल्याने या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले असून संपूर्ण राज्याचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT