manoj jarange esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : ''उद्या 11 वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील निर्णय जाहीर करणार'', खोतकर म्हणाले...

संतोष कानडे

जालनाः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जीआर काढत असल्याचं आश्वासन दिल्यानंतर जालन्यामध्ये अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली.

अर्जुन खोतकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. मी आणि राजेश टोपे मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होतो. दिवसभरात जवळपास आमचे १० फोन झाले असतील. ज्या मागणीसाठी जरांगे पाटलांनी आंदोलन केलं त्यातल्या बऱ्याचश्या गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत.

खोतकर पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी कुणबी समाजाच्या नोंदीसंदर्भात आश्वासन दिलं होतं. आता त्यांनी जीआर काढला असून बहुतांश मागण्या मान्य झालेल्या आहेत. येणारी कॅबिनेटची बैठक मराठवाड्यात होत आहे, तेव्हा उर्वरित मागण्या पूर्ण केल्या जातील. उद्या सकाळी ११ ची वेळ मनोज जरांगे पाटलांनी दिलेली आहे. त्यांनी सहकाऱ्यांशी बोलून उपोषण सोडण्याचा निर्णय घ्यावा, ही विनंती.

''मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या वतीने त्यांना उपोषण मागी घेण्याची विनंती करतो'' असं म्हणून त्यांनी उद्या जरांगे पाटील उपोषण मागे घेतील, असं सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी जीआर काढण्यासंदर्भात भाष्य केलेलं आहे. अद्याप जीआर निघालेला नाही.

काय म्हणाले मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, महसुली, शैक्षणिक, निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले दिले जातील. यासंदर्भातील पडताळणी करण्यासाठी एक निवृत्त न्यायाधीशांची कमिटी गठीत केली असून निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे आणि पाच अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे. यासंदर्भातला जीआर काढला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर फडणवीसांचा मोठा संकेत; ‘चर्चेची दारे खुली, कायदेशीर चौकटीत तोडगा काढू’

Panchganga River Incident : रक्षाबंधनाची राखी हातात अन्... बहिणीच्या डोळ्यांदेखतच भावाने पंचगंगा नदीत मारली उडी; रुई पुलावर थरार

NASA Roman: हबलपेक्षा तब्बल 1000 पट वेगवान! नासाची रोमन दुर्बीण अवकाशात; विश्वाच्या गूढ रहस्यांचा घेणार वेध

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज; 'या' तीन जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा

Almatti Dam Height Controversy : कोल्हापूर-सांगलीला महापुराचा धोका? आलमट्टीची उंची 524.26 मीटर करण्यास महाराष्ट्राचा तीव्र विरोध; सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार!

SCROLL FOR NEXT