Maratha Reservation Manoj Jarange  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : सरकारला किती अन् कशासाठी वेळ हवा? सर्वपक्षीय बैठकीनंतर जरांगेचा सवाल

आज मुंबईत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती.

रोहित कणसे

मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला ३२ जण उपस्थित होते. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे या मुद्द्यावर सर्वांचे एकमत झाले. तसेच मराठा आरक्षणासाठी आणखी वेळ द्यावा अशीही मागणी करण्यात आली आहे. यानंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वपक्षीय बैठकीनंतर, इतर समाजावर अन्याय न होता मराठ्यांना आरक्षण मिळावं असं आमचं याबाबत सर्वांचं एकमत झालं असून मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोग युध्द पातळीवर काम करत आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा, मराठा समाजाने संयम राखावा, मनोज जरांगे यांनी सरकारला सहकार्य करावे ही सर्वपक्षीय नेत्यांची भावना असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीनंतर बोलताना म्हणाले.

याबद्दल विचारले असता मनोज जरांगे यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. जरांगे म्हणाले की, सरकारला किती आणि कशासाठी वेळ हवा आहे? तसेच सरसकट महाराष्ट्राला आरक्ष लगेच देणार का? समाजाला विचारून बघू अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे.

बैठकीत काय झालं याचा तपशील मिळाला नाही, गोरगरिबांच्या लेकरांकडे लक्ष न देता सरकार नुसत्या बैठका घेत आहे. मराठा समाजाच्या लेकरांचे विनाकारण मुडदे पडत आहेत, तरी लक्ष देत नाहीत. हसण्यावारी नेत आहेत. हे जनता सांभाळणारं सरकार म्हणायचं काय. गोरगरिबांच्या लेकरावर गुन्हे दाखल केले जात आहेत, असेही मनोज जरांगे म्हणाले.

तुम्हाला सुट्टी नाही. तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या. तुम्हाला वेळ कशासाठी पाहिजे आणि का पाहिजे? आणि महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार का? हे सांगा. तुम्हाला अर्धा तास द्यायचा की वेळचं द्यायचा नाही हे आम्ही मराठे विचार करून सांगतो. तुमच्या मनात काय आहे ते तरी कळू द्या, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump : इस्रायलच्या हल्ल्याला अमेरिकेची साथ; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ''इराण कधीही...''

Pimpri Chinchwad Noise: कर्णकर्कश सायलेन्सरवर ‘रोडरोलर’; पिंपरी-चिंचवड पोलिसांची ३६८ दुचाकींवर धडक कारवाई

Latest Marathi News Live Update : मेहरूण तलाव वाचवण्यासाठी जळगावात आजपासून आमरण उपोषण

Agriculture News : ४३० एकरवरील फुलशेती कोमेजली! हक्काच्या बाजारपेठेसाठी शेतकरी आता मुख्यमंत्र्यांच्या दारी

Board Exam Teacher Harassment : शिक्षण क्षेत्राला काळिमा! बोर्डाचा पेपर द्यायला आलेल्या मुलीचा मोबाईल नंबर घेतला आणि...; छेड काढणाऱ्या शिक्षकाला केंद्रावरच चोपलं

SCROLL FOR NEXT