Manoj Jarange sakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : २८८ पाडायचे की निवडून आणायचे २० तारखेला ठरवू; जरांगेंनी सांगितला उपोषण ते आंदोलनापर्यंतचा सगळा प्लॅन

Manoj Jarange On Maharashtra Assembly Election : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पुन्हा एकदा पेटताना दिसत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे २० जुलैपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत.

रोहित कणसे

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पुन्हा एकदा पेटताना दिसत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे २० जुलैपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. तर मराठा शांतता रॅलीचा पश्चिम महाराष्ट्रातील दुसरा टप्पा ७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे, अशी माहिती जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. मराठा शांतता रॅलीचा दुसरा टप्पा हा सोलापूर येथून सुरू होणार आहे तर त्याचा समारोप हा नाशिकमध्ये होईल असेही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढवण्याबद्दल विचारले असता जरांगे पाटील म्हणाले की, मी २० तारखेला उपोषणाला बसतोय, त्या दिवशी मराठा समाजाची किती तारखेला बैठक घ्यायची ते ठरवले जाईल. महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज त्या दिवशी बैठकीला एकत्र येईल आणि त्याच दिवशी मराठा समाजाला विचारून मी ठरवणार आहे की, २८८ निवडून आणायचे की पाडायचे, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे यांना देवेंद्र द्वेष हा रोग झालाय असं म्हणणारे भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर यावेळी मनोज जरांगेंनी शेलक्या भाषेत टीका केली. ज्या मुलांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे अशा ४०० ते ५०० पोरांना ठाण्याच्या एसपींनी कुणबी प्रमाणपत्र असताना बाहेर काढून ओपन कॅटगरीमध्ये टाकलं. तुम्हाला मराठ्यांची आस्था असेल तर हे देवेंद्र फडणवीसांनी असं का केलं ते विचारा असेही मनोज जरांगे यावेळी प्रसाद लाड यांना उद्देशून म्हणाले. यावेळी मनोज जरांगे यांनी पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका मुलाचे कुणबी प्रमाणपत्र देखील माध्यमांसमोर दाखवले.

तसेच मनोज जरांगे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांना देखील इशारा दिला. ते म्हणाले की, तुम्ही मराठ्यांचे आमदार, मंत्री अंगावर घालू नका. तुम्ही मराठ्या-मराठ्यांमध्ये मारामारी लावू नका. देवेंद्र फडणवीस साहेब मी गोडीत सांगतोय. मराठे आता मारामाऱ्या करणार नाहीत, ते तुमच्याकडे निघतील. तुम्ही भांडण लावून आमची मजा बघू नका, मराठे खवळले तर गय करणार नाहीत, असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajat Patidar: ट्रॉफी जिंकताच कॅप्टन रजत पाटीदारचा मोठा खुलासा, हे सगळं आधीच ठरलेलं होतं' म्हणत नेमकं काय बोलून गेला? पाहा..."

अभिनय क्षेत्रातून अचानक गायब झालेले गिरीश परदेशी आता काय करतात? १० वर्षांनंतर सांगितलं खरं कारण

Stock Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 75,000 पार, Suzlon फोकसमध्ये; पाहा महत्त्वाचे अपडेट्स

Nanded: दीड महिन्यापासून भाऊ कोमात, उपचारसाठी पैसे घेऊन निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू; लेक पोरकी, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Chandrapur: घरात गांजाचा साठा; चंद्रपुरात तरुण अटकेत; मातंग मोहल्ल्यात पोलिसांचा छापा; १ किलो गांजा जप्त

SCROLL FOR NEXT