Maratha Reservation Latest News  
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : मनोज जरांगे पुन्हा मैदानात! आजपासून अंतरवालीत सुरू करणार बेमुदत उपोषण

Maratha Reservation Latest News : मनोज जरांगे पाटील हे शनिवारपासून (ता. १०) अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे समाजबांधवांची बैठक घेऊन बेमुदत उपोषणाला सुरवात करणार आहेत.

रोहित कणसे

वडीगोद्री (ता.अंबड, जि.जालना) : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शासनाने कुणबी प्रमाणत्र देताना सगेसोयऱ्यांचाही समावेश करावा, तसा कायदा मंजूर करावा, मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे अधिवेशन त्वरित घ्यावे, आरक्षण अधिसूचना व मसुद्याची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे शनिवारपासून (ता. १०) अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे समाजबांधवांची बैठक घेऊन बेमुदत उपोषणाला सुरवात करणार आहेत. (Maratha Reservation Latest News)

मुंबईला आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी समाजबांधवांसह २० जानेवारीला मुंबईकडे कूच केली होती. वाशी येथे आंदोलक पोचताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. सगेसोयऱ्यांच्या समावेशासह विविध मागण्या मान्य करीत काही अधिसूचनेचे मसुदे दिले होते. त्यानंतर तेथेच हे आंदोलन स्थगित केले होते.

मात्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे, तसे न झाल्यास दहा फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला होता. दरम्यान, अंतरवाली सराटीसह राज्यातील मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी अंतरवालीतील शिष्टमंडळाने अंबडचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्यासोबत चर्चा करून निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विषारी दारुकांडातील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची मदत, महापालिकेत नोकरीबाबत सकारात्मक निर्णय घेणार

Rajat Patidar: Dhoni रोहितची बरोबरी? फायनलपूर्वी RCB कर्णधार रजत पाटीदारने मनातील गोष्ट सांगितली म्हणाला मी कधी विचार..

Gemini Omni ने बदलली व्हिडिओ एडिटिंगची दुनिया; AI वापरुन मिनिटात बनवा हवा तसा व्हिडिओ, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

US-Iran Deal : अमेरिका-इराण अंतिम करार पुन्हा खोळंबला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'या' २ नव्या मागण्यांनी वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT