Manoj Jarange Esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange: "मी मराठ्यांवर अन्याय होऊ देणार नाही," जरांगेंची आक्रमक भूमिका; आरक्षणाचा प्रश्न पेटणार

Laxman Hake: "आम्हाला 13 टक्के आरक्षण दिले ते तुम्हीच रद्द केले. त्यानंतर 10 टक्के आरक्षण द्यायच्या आधीच कोर्टात याचिका दाखल झाली. आणि मग आम्ही बोललो की तुम्हा आम्हाला जातावादी म्हणता."

आशुतोष मसगौंडे

एककडी मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी उपषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी ते मागे घेतल्यानंतर, जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणाला बसले आहे. हाके यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत.

अशात, मनोज जरांगे यांनी, मी मराठ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, सरकार त्यांच्याबाबत सकारात्मक आणि आमच्याबाबत नकारात्मक भूमिका घेऊ शकत नाही.

उपोषण केल्यामुळे जरांगे यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे उपोषण सोडल्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांनी आज रुग्णालयातूनच पत्रकार परिषद घेत या सर्व घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, "तुम्ही आम्हाला 13 टक्के आरक्षण दिले ते तुम्हीच रद्द केले. त्यानंतर 10 टक्के आरक्षण द्यायच्या आधीच कोर्टात याचिका दाखल झाली. आणि मग आम्ही बोललो की तुम्हा आम्हाला जातावादी म्हणता. सर्व खोड्या तुम्हीच करता. आता 57 लाख कुनबी नोंदी सापडल्या आहेत. त्या रद्द करण्याची मागणी होत आहे. असे असले तरी मी मराठ्यांवर अन्याय होऊ देणार नाही."

पुढे बोलताना जरांगे म्हणाले, "आमच्या 58 लाख कुनबी नोंदी खोट्या नाहीत. त्यामुळे मी वेळेप्रसंगी बलिदान देईन पण समाज्यावर अन्याय होऊ देणार नाही. आणि आमच्या सर्व मागण्याचा पाठपुरावा करण्यासाठी समाज खंबीर आहे.

यावेळी मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही मोठे आरोप केले. ते म्हणाले, "भुजबळ म्हणत आहेत की, ते आंदोलनाच्या स्थळी जाणार असून, ते माझीच मुले आणि पंटर आहेत.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमिवर आज सरकारचे शिष्ठमंडळ लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करण्यासाठी वडीगोद्रीला जाणार आहे. जेथे ओबीसी बांधवांचे उपोषण सुरू आहे. त्यामुळे 9 दिवसांनंतर तरी हाकेंच्या आंदोलनावर तोडगा निघणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारच्या या शिष्ठमंडळात छगन भुजबळ, गिरीश महाजन, उदय सामंत, संदीपान भुमरे, अतुल सावे आणि धनंजय मुंडे यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT