Manoj Jarange  esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Patil : 'ओबीसींची मोट बांधण्याच्या भानगडीत पडू नका...'; जरांगेंचे शिंदे-फडणवीसांना आवाहन

Manoj Jarange Latest News : मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलं आहे

रोहित कणसे

राज्यात सध्या मराठा विरूद्ध ओबीसी आरक्षणाचा वाद चांगलाच पेटताना दिसत आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांनी जोर धरल्यानंतर दुसऱ्या बाजूने राज्यामध्ये ओबीसी समाजाचं एक आंदोलन उभं राहीले आहे. राज्याच्या मागासवर्ग आयोगामध्ये काम केलेले आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांनी जालन्यातल्या वडीगोद्री येथे उपोषणाला सुरूवात केली होती. यानंतर राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसा असा आरक्षणाचा वाद पेटला आहे.

यादरम्यान आज ओबीसी आरक्षण बचावासाठी मागच्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं आहे. यावेळी सरकारने आपल्या दोन मागण्या मान्य केल्याचे हाके म्हणाले. यामुळे सरकारकडून दोन्ही नेत्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. यादरम्यान मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींची मोट बांधण्याच्या भानगडीत पडू नये असा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो. ओबीसींची मोट बांधण्याच्या भानगडीत पडू नका. ओबीसीची मोट बांधू म्हणून पाठबळ द्याल आणि मराठ्यांवर अन्याय कराल.... तर तुम्हाला जाहीर सांगतो मराठ्यांशिवाय राज्यात पानही हलू शकत नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

तुम्ही आम्हाला आणि त्यांनाही चुचकाराल आणि मराठ्यांचा घात कराल. अंधारातून त्यांना पाठबळ द्याल, आमच्या अंगावर त्यांना घालाल आणि ओबीसींची मोट बांधयाचा तुमचा डाव असेल तर मनोज जरांगे तो यशस्वी होऊ देणार नाही. मराठ्यांवर जर १३ तारखेपर्यंत अन्याय झाला तर सर्व मराठे एका बाजूने आहेत. तुमच्या पक्षातील देखील मराठ्यांचे नेते देखील अन्याय आता सहन करू शकत नाहीत.

तुमच्या पक्षातील मराठा नेत्यांनी डोळ्यांसमोर होणार इतका अन्याय पाहूण देखील ते तुमच्यासोबत राहिले तर त्यांच्या पाठिमागील एकही मराठा त्यांच्यासोबत राहाणार आहे. जात वाचवणं ही भाजपमधील मराठ्यांची देखील जबाबदारी आहे.

फडणवीस साहेब तुम्ही तो डाव टाकू नका. मी हात जोडून सांगतो. ओबीसींची मोट बांधण्याच्या नादात तुम्ही त्यांना पाठबळ पुरवाल. कारण असं यापूर्वी घडलंय, असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPचा दिल्लीत एल्गार! अभिजीत दीपकेंच्या पक्षाकडून ५ सप्टेंबरला मोर्चाची घोषणा; काय आहेत मागण्या?

NEET PG Admit Card 2026: ३० ऑगस्टला होणार नीट पीजी परीक्षा; डायरेक्ट लिंकवरून 'असे' डाऊनलोड करा हॉल तिकीट...

भारत-पाकिस्तान सीमेवर ‘तारिणी’चं शूटिंग! बॉर्डरवर शूटिंग करणारी ‘तारिणी’ ठरली पहिली मराठी मालिका!

Marathi News Live Updates : E20 इंधनाच्या मुद्द्यावर लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा यासाठी आम्ही आज एक व्हॉट्सॲप क्रमांक जारी करत आहोत - केजरीवाल

Palghar Ashramshala: गडचिराेलीनंतर पालघरच्या आश्रमशाळेत धक्कादायक घटना; ७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, १९ जणांना ताप

SCROLL FOR NEXT