Maratha Andolan Bachchu Kadu and Manoj Jarange  
महाराष्ट्र बातम्या

Maratha Andolan : मराठा समाजाने आता आंदोलन मागे घ्यावं; बच्चू कडू यांनी व्यक्त केली इच्छा

रवींद्र देशमुख

नंदूरबार - जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आज १०वा दिवस असून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणावर ठाम आहेत. आज सरकारच्या जीआरनंतर ते उपोषण सोडतील असं वाटलं होतं. मात्र त्यांनी आरक्षणावर ठाम असल्याचं सांगितलं. यावर आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया आली आहे.

बच्चू कडू म्हणाले की, राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत असून सरकारकडून आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे. तरी देखील त्यांनी उपोषण मागे घेतलं नाही. हे आंदोलन आता मागे घेतलं गेलं पाहिजे. खुद्द मुख्यमंत्री अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने आरक्षणाचा विचार करत आहेत.

दरम्यान कुणबी हा मराठा आहे आणि मराठा हाच कुणबी आहे. आम्ही देखील मराठा आहोत. मराठा हे नाव एका जातीचे नव्हे, धर्माचे नाही, पंथाचे नाही. संपूर्ण महाराष्ट्र मुलुखाचे आहे. महाराष्ट्रात जे जे राहता ते सर्व मराठे आहेत. चुकून त्यांनी मराठी लिहिले. त्यामुळे त्यांना आरक्षण मिळालं नाही. मात्र आता आंदोलन हे मागे घेतले पाहिजे अशी इच्छा बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT