Maratha Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : परभणीत तहसील कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न; सतर्कतेमुळे अनर्थ टळला

सकाळ वृत्तसेवा

पूर्णाः येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अज्ञात आंदोलकांनी पेट्रोल टाकून आग लावली. तहसील कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु उपस्थित पोलिस व महसूल कर्मचार्‍यांच्या प्रसंगावधानामुळे अप्रिय घटना टळली.

बुधवारी (ता.१ ) सकाळी साडेदहाच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अज्ञातांनी पेट्रोल टाकून आग लावली. तेथे उपस्थित महसूल कर्मचारी व पोलीस कर्मचारी वामन चव्हाण यांनी सतर्कता दाखवत कार्यालयातील आग रोधक सिलेंडर फोडून लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आर. रागसुधा शहरात दाखल झाल्या. दोन दिवसांपूर्वी तहसीलदारांची शासकीय जीप व झिरोफाटा येथे पोलिस वाहन अज्ञात आंदोलनकर्त्यांकडून फोडल्याची घटना घडली होती. सध्या तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद, न्यायालय येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी दिली.

पोलिस अधीक्षक आर. रागसुधा, महसूल अधिकारी, स्थानिक पोलीस अधिकारी, शहरातील राजकीय सामाजिक कार्यकर्ते, शांतता समितीच्या सदस्यांशी वार्तालाप करत कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी बोलताना आर. रागसुधा म्हणाल्या, मराठा समाजाचे आंदोलन शांततेत सुरू आहे. त्याला गालबोट लागेल असे कृत्य कोणीही करुन कायदा हातात घेऊ नये. तसेच शासकीय संपत्तीचे नुकसान करु नये असे आवाहन केले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हदेव गावडे, पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, नरसिंह पोमनाळकर यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रताप कदम, माजी शहरप्रमुख नितीन उर्फ बंटी कदम, काँग्रेसचे शेख इलियास यांच्यासह गावचे पोलिस पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT