महाराष्ट्र बातम्या

...तर मला मुख्यमंत्री करा - संभाजीराजे छत्रपती

नामदेव कुंभार

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मोर्चाच्या पुढाकाराने शुक्रवारी बीड येथे मराठा आरक्षण जनसंवाद झाला. जनसंवाद कार्यक्रमाला संबोधन झाल्यानंतर संभाजीराजे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी येथील एका तरुणाच्या प्रश्नाला उत्तर देताना संभाजीराजे यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा आहे.

ओबीसी समाजातून आरक्षण का नको? असा प्रश्न एका तरूणाने संभाजीराजे यांना विचारला. प्रश्न विचारणारा तरुण या सर्वाचं मोबाईलवर रेकॉर्डिंग करत होता. हे पाहून संभाजीराजे छत्रपती यांनी त्याला हीच मागणी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाची असल्याचं सांगितलं. या प्रश्नानंतर जनसंवाद कार्यक्रमात काही काळ थोडा तणाव तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मात्र प्रश्न विचारणाऱ्या तरूणाला छत्रपती संभाजीराजे यांनी व्यासपीठावर समोर उभं करून समजावून सांगितलं. ते म्हणाले की, 'जो प्रश्न तुम्ही मला विचारत आहात, तोच प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारा. उपमुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांनासुद्धा विचारला पाहिजे. पण तुम्ही विचारत नाही. मला विचारायचा असेल तर मला मुख्यमंत्री करा.', असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले. पण, हे वाक्य संपत असतानाच मला मुख्यमंत्री व्हायचे नाही. मला बहुजन समाजाला न्याय द्यायचा आहे, अशी भूमिकासुद्धा त्यांनी बोलून दाखवली.

अध्यादेशासाठी पंतप्रधानांना भेटणार

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने दाखल केलेली फेरआढावा याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता मोठी कसोटी आहे. पक्षविरहित सर्वांनी एकत्र येऊन केंद्रापर्यंत आवाज पोचवावा लागेल. यासाठी नेतृत्वच नाही तर पुढाकार घेणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. केंद्राने अध्यादेश काढून घटनेत दुरुस्ती करावी, यासाठी सर्व खासदारांना एकत्र करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचे ते म्हणाले. ‘समाजाला रस्त्यावर आणू नका. त्यांना वेठीस धरू नका. तुम्ही समाजासाठी काय करणार ते सांगा. आता केवळ राज्यपालांना पत्र देऊन उपयोग नाही. मागासवर्ग आयोगाकडून समाजाचे फेरसर्वेक्षण करायला हवे. समाजाचा मागासवर्ग प्रवर्गात समावेशाच्या शिफारशीचा अभ्यासपूर्ण अहवाल सादर होणे गरजेचे आहे, असे संभाजीराजे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT