chandrakant patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील अनुपस्थित; 'हे' नेतेही गैरहजर

संतोष कानडे

मुंबईः मराठा आरक्षणावर सखोल चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत एक बैठक बोलावली आहे. या सर्वपक्षीय बैठकीला अनेक महत्त्वाचे नेते अनुपस्थित असल्याचं निदर्शनास येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचीच बैठकीसाठी उपस्थिती नाहीये.

मराठा आरक्षणासाठी मागच्या १३ दिवसांपासून जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या परंतु तोडगा निघालेला नाही. मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी जरांगेंची मागणी आहे. त्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे या बैठकीला उपस्थित नाहीत. तसेच विनय कोरे, बच्चू कडू, महादेव जानकर, हितेंद्र ठाकूर, रवी राणा, अशोक चव्हाण, नाना पटोले, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, जयंत पाटील (शेकाप) हे नते अनुपस्थित आहेत.

विशेष म्हणजे मंत्रिमंडळ उपसमितीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण हेदेखील या बैठकीला उपस्थित नाहीत. तर उपस्थित नेत्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, सुनील तटकरे, रेखा ठाकूर, कपिल पाटील, छगन भुजबळ, अनिल परब, राजेश टोपे, जयंत पाटील, सदाभाऊ खोत, संभाजीराजे छत्रपती, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, राजू पाटील, उदय सामंत, चंद्रशेखर बावनकुळे, दादा भुसे या नेत्यांचा समावेश आहे.

दरम्यान, जालन्यातील अंतरवाली येथे १ सप्टेंबर रोजी पोलिसांनी उपोषणकर्त्यांवर तुफान लाठीहल्ला केला होता. राज्यभरात त्या घटनेचा निषेध झाला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. सरकारने दोनवेळा जीआरदेखील काढला मात्र जरांगेंचं समाधान झालं नाही.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी मनोज जरांगेंनी लावून धरली आहे. उद्या त्यांच्या उपोषणाचा पंधरावा दिवस आहे. त्यांनी औषध, पाणी आणि सलाईन नाकारलेलं आहे. त्यामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री काय बोलतात, हे पाहावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Munde news: मुंढेंचा दणका, अकोल्यात गुटख्याचा कारखाना उद्धवस्त..50 लाखांचा माल जप्त..

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस-वेवर अपघात, पाच कार अन् एक बसची एकमेकांना धडक, प्रवाशी किरकोळ जखमी

घटस्फोट पाहिले, नाती तुटताना पाहिली... लग्नाआधीच ऋषी सक्सेनासोबत लिव्ह-इनमध्ये का राहते ईशा केसकर? स्वतः सांगितलं कारण

MPSC Exam Update: एमपीएससी ऑनलाइन परीक्षा ऑगस्ट २०२७ पर्यंत पुढे ढकलण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना; अधिकृत निर्णयाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष

SCROLL FOR NEXT